शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

खचलेल्या विहिरींच्या दुरुस्तीचे आव्हान

By admin | Updated: April 14, 2015 00:37 IST

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकार; अधिका-यांचे दुर्लक्ष, अद्याप मदत नाही.

बुलडाणा : अतवृष्टीत खचलेल्या, बुजलेल्या विहिरी महात्मा गांधी रोजगार योजनेंतर्गत ३१ मेपर्यंत बांधून दुरुस्ती करणे शासनाने बंधनकारक केले आहे; परंतु प्रशासनाची कामाची गती पाहता ते पूर्ण होण्याची शक्यता फार कमी आहे. तर खचलेल्या विहिरींना अद्यापपर्यंत मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यात विविध योजनेच्या माध्यमातून आतापर्यंंत २0 हजारांवर विहिरी घेण्यात आल्या आहेत. त्यात अकोला जिल्ह्या तील ९६, बुलडाणा जिल्ह्यातील ८६९ व वाशिम जिल्ह्यातील १ हजार ४६३ असा एकूण पश्‍चिम वर्‍हाडातील २ हजार ४२८ अतवृष्टीत खचलेल्या व बुजलेल्या विहिरींचा समावेश आहे. या विहिरींची डागडुजी करण्यासाठी २४ सप्टेंबर २00८ च्या शासन निर्णयाद्वारे शेतकर्‍यांना मदत करण्याचे निश्‍चित झाले होते; परंतु शेतकर्‍यांना मदत मिळाली नाही. १७ डिसेंबर २0१३ च्या दुसर्‍या शासन निर्णयानुसार राज्यात २0१३ मध्ये झालेल्या अतवृष्टीत खचलेल्या व बुजलेल्या विहिरींसंदर्भात कृषी व महसूल खात्याच्या अधिकार्‍यांनी संयुक्तरित्या पंचनामा करून निश्‍चिती करावी तसेच बुजलेल्या विहिरींची नोंद सातबारावरून कमी करण्याबाबत महसूल व वन विभागाने दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक ती कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. खचलेल्या विहिरींसंदर्भातही कृषी व महसूल विभागाने संयुक्तपणे प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून अहवाल तयार करावा, असेही सांगण्यात आले होते. यामध्ये तलाठी व कृषी विभागाच्या प्रतिनिधीला संबंधित शेतकर्‍याच्या विहिरीवर जाणे बंधनकारक केले होते; परंतु संबंधित अधिकारी घटनास्थळी जाण्याचे टाळाटाळ करीत असून, शेतकर्‍यांना लेखी अर्ज करण्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांची नावे सुटल्यामुळे रोष व्यक्त झाला. त्यानंतर शासन निर्णयानुसार ३१ डिसेंबर २0१४ पर्यंत या विहिरींची पाहणी करून नेमके किती नुकसान झाले, हे निश्‍चित करून त्याची दुरुस्ती होणे बंधनकारक होते; परंतु असे होत नसल्याचे शासनाच्या लक्षात आल्यानंतर ५ जानेवारी २0१५ ला पुन्हा शासनाने एक नवीन आदेश काढला. यामध्ये या कामासाठी ३१ मे २0१५ पर्यंंत मुदतवाढ देण्यात आली आहे.