शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी

By admin | Updated: April 10, 2017 00:31 IST

बुलडाणा : ‘अहिंसा परमो धर्म’ व ‘जियो और जिने दो’चा संदेश संपूर्ण भारताला देणारे भगवान महावीर यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली.

बुलडाणा : ‘अहिंसा परमो धर्म’ व ‘जियो और जिने दो’चा संदेश संपूर्ण भारताला देणारे भगवान महावीर यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून ९ एप्रिल रोजी शोभायात्रा काढण्यात आली.भगवान महावीर यांचा जन्मकल्याणोत्सव संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त महावीरनगरस्थित दिगंबर चंद्रप्रभू जैन मंदिरात साजरा करण्यात आला. यावेळी रस्त्यावर सडामार्जन व आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. जैन मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ९ एप्रिल रोजी दिगंबर जैन चंद्रप्रभू जैन मंदिरातून शोभायात्रा सकाळी ७.३० वाजता काढण्यात आली. ही शोभायात्रा महावीरनगर, केशवनगर, एकतानगर, सर्क्युलर रोड मार्गे जैन मंदिरात पोहोचली. यावेळी ठिकठिकाणी नागरिकांनी शोभायात्रेचे स्वागत करून पुष्पवृष्टी केली. चौका-चौकांत जैन बांधवांना सरबतचे वाटप करण्यात आले. ब्र्राम्हण जागृती सेवा संघ, उमेश गवले यांनी सरबतचे वाटप केले. शोभायात्रेत लहान मुले, आबालवृद्ध, महिला, तरुण यांनी केशरी फेटे परिधान केले होते. लहान मुलांनी जैन समाजाचा ध्वज हातात घेतले होते. तसेच पुरुषांनी व युवकांनी पांढरा पोषाख परिधान केला होता. शोभायात्रा सर्क्युलर रोड येथे आल्यानंतर भाजपाच्या शहराध्यक्षा विजया राठी, नगरसेवक गोंविद सराफ, उदय देशपांडे, मंदार बाहेकर यांनी जैन बांधवांवर पुष्पवृष्टी केली. भगवान महावीर जन्मकल्याणोत्सवाच्या वेळी सकाळी भगवान चंद्रप्रभू यांच्या मूर्तीचा जलाभिषेक करण्यात आला. अभिषेक करण्यासाठी जैन बांधवांनी बोली लावली होती. यावेळी मंत्रोपच्चार व धार्मिक शास्त्रपूजन करण्यात आले. त्यानंतर मंदिर परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भगवंतांच्या जयघोषात मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी ‘भगवान महावीर की जय हो’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. तसेच ८ एप्रिल रोजी जैन युवा मंचातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. नगरनाईक, डॉ. बोराळकर, डॉ. मेहुणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. सायंकाळी प्राची माडीवाले आणि त्यांच्या संचाने भजन संध्या कार्यक्रम सादर केला. शेवटी महाप्रसादाचा लाभ जैन बांधवांनी घेऊन जयंतीची सांगता करण्यात आली. यावेळी सकल दिगंबर जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.