शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मृतकाच्या नावावर केली प्लॉटची खरेदी

By admin | Updated: July 3, 2015 23:48 IST

बुलडाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथील प्रकार; आठ लोकांवर गुन्हा दाखल.

बुलडाणा : चौदा वर्षांंपूर्वी मरण पावलेल्या व्यक्तीला कागदोपत्री जिवंत दाखवून आठ जणांनी त्याच्या प्लॉटची बनावट खरेदी केल्याचा खळबळजनक प्रकार देऊळघाट येथे उघडकीस आला आहे. या बनावट खरेदीची तक्रार झाल्यानंतर शहर पोलिसांनी २८ जून रोजी तमकिन अहमद अ. रऊफ, इरफान बेग युनूस बेग, साकीब अहेमद सालीक अहेमद, अनिस अहमद अब्दुल रऊफ, गुलाम रसूल टेलर, सालिक अहमद अ.रऊफ, सोहिल अहमद अ. रऊफ याच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपीपैकी इरफान बेग यास अटक करण्यात आली आहे. देऊळघाट येथील सेवानवृत्त शिक्षक जियाउद्दीन अ. करीम यांनी तक्रारीत नमूद केले की, देऊळघाट येथील गट नंबर मधील प्लॉट क्रमांक हा जईम अहमद याने १९ डिसेंबर १९८९ रोजी विकत घेतला होता; परंतु तो जूून १९९0 रोजी आजाराने मरण पावला. त्याच्या अकाली निधनामुळे प्लॉटची फेरफार घेण्याचे राहून गेले. आठ दिवसांपूर्वी उपरोक्त प्लॉटवर जागेचे बांधकाम मोजमाप करण्यासाठी गेलो असता, पुतण्या तमकीन अहमद अ. रऊफ याने तेथे येऊन हा प्लॉट हा माझ्या मालकीचा असून त्यावर बांधकाम करू शकत नाही, असे सांगितले. एवढेच नव्हे तर त्याने २८ एप्रिल २0१४ रोजी केलेले खरेदी खत दाखविले. ते खरेदी खत पाहून धक्काच बसला. वास्तविक ज्याच्या नावे प्लॉट होता, त्याचा मृत्यू १९९0 मध्ये झालेला आहे. बुलडाणा पोलिसात मो. जियाउद्दीन यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी तमकीन अहेमद अ.रऊफ, इरफान बेग युनुस बेग, साकीब अहेमद सालिक अहेमद, सालिक अहेमद अ. रऊफ, सोहिल अहेमद अ. रऊफ सर्व रा. बुलडाणा तसेच अनीस अहेमद अ. रऊफ, गुलाम रसुल ऊर्फ अशू टेलर रा. देऊळघाट यांच्यावर भ भादंवि ४२0, ४६७, ४७१,३४, १२0(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एकाला अटक करण्यात आली असून इतर आरोपींना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाल्याचे कळाले.