शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्याला वादळी वा-याचा तडाखा

By admin | Updated: October 19, 2014 00:08 IST

बुलडाण्यात वादळी वा-याचे थैमान; झाडेही उन्मळून पडली; जीवित हानी नाही.

बुलडाणा : मोताळा तालुक्यातील पिंप्रीगवळी येथे काल वादळीवार्‍याचा तडाखा बसल्यानंतर शनिवारी दुपारी १ वाजता बुलडाण्यात वादळीवार्‍याचे थैमान शहरवासीयांनी अनुभवले. तब्बल एक तास सोसाट्याच्या वार्‍यासह कोसळलेल्या पावसामुळे शहरातील अनेक मार्गांवरील झाडे पडली. शासकीय कार्यालय परिसरातील झाडेही उन्मळून पडली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.दुपारी १ वाजता आलेल्या पावसाने तहसील कार्यालय, न्यायालय परिसर व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेली झाडे पडली. अनेक घरांच्या खिडक्यांची तावदाणेसुद्धा तुटली. साधारण: दोन वाजेच्या सुमारास पाऊस बंद झाला व अवघ्या काही क्षणात पुन्हा उन्ह पडले. एक तासाच्या पावसामुळे शहरातील जनजिवन विस्कळीत झाले होते. दिवाळीच्या बाजारासाठी रस्त्यावर तसेच फुटपाथवर दुकान मांडून बसलेल्या किरकोळ विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे काही व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे काही ठिकाणी विजेचे खांब वाकून तारा तुटल्या होत्या. *मेहकरात मुसळधार पाऊसमेहकर परिसरात गत चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. शनिवारला दु पारच्या दरम्यान शहरासह परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोयाबीन सोंगणीच्या हंगामात अचानक आलेल्या या अकाली पावसामुळे शेतकर्‍यांनी ताडपत्री, मेनकापड खरेदी करण्यास शहरातील दुकानांमध्ये गर्दी केली होती. मुसळधार पावसाने सोयाबीन सोंगणीला व्यत्यय आणला; परंतु हा पाऊस कपाशी व तूर पिकासाठी संजीवनी ठरत आहे.