बुलडाणा पालिकेने लावले हॉटेलला सील

By Admin | Updated: March 27, 2015 01:40 IST2015-03-27T01:40:25+5:302015-03-27T01:40:25+5:30

थकित मालमत्ता कराचा भरणर न केल्याने कारवाई.

Bulldhana municipal police sealed the hotel | बुलडाणा पालिकेने लावले हॉटेलला सील

बुलडाणा पालिकेने लावले हॉटेलला सील

बुलडाणा : मालमत्ता कराचा भरणा न केल्यामुळे येथील हॉटेल राधीकाला नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी गुरूवारी सील लावले. सध्या शहरात पाणीपट्टी, नळपट्टी आणि मालमत्ता कर वसुलीची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे मोठय़ा प्रमाणावर कराची रक्कम बाकी आहे अशा थकबाकीदार मालमत्ता करधारकाकडे नगरपालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील हॉटेल राधिकाचे मालक शैलेश झुंबड यांच्याकडे १ लाखापेक्षा जास्त रक्कम थकबाकी असल्यामुळे त्यांच्या हॉटेल राधिकाला आज गुरूवारी सकाळी पालिकेने सील ठोकले. दरम्यान, आज शहरातील दहा व्यापार्‍यांना नगरपालिकेने सूचना देऊन १२ तासात थकबाकी भरा, अन्यथा दुकानांना सील लावण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Bulldhana municipal police sealed the hotel