शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

Buldhana: शहर पोलिसांनी जाणले त्याचे मर्म, हक्काचा निवारा मिळवून देत जोपासला माणुसकी धर्म...

By अनिल गवई | Updated: March 18, 2023 17:44 IST

Buldhana News: वाद...विवाद आणि भांडणे ही सामान्यांमध्ये आणि त्यांच्या घरातच होतात असे नाही, तर वेडसर आणि बेघरांच्या जीवनातही उपरोक्त गोष्टी्चे ग्रहण असते. याचा प्रत्यय खामगाव शहरातील शहर पोलीसांना नुकताच आला.

- अनिल गवई खामगाव - वाद...विवाद आणि भांडणे ही सामान्यांमध्ये आणि त्यांच्या घरातच होतात असे नाही, तर वेडसर आणि बेघरांच्या जीवनातही उपरोक्त गोष्टी्चे ग्रहण असते. याचा प्रत्यय खामगाव शहरातील शहर पोलीसांना नुकताच आला. पोलीसांनी दोघांना आवरले. त्यांची व्यथा ऐकून घेतली. प्रेमात धोका बसल्याने, वेडा झालेल्या एकाने आपली आपबिती कथन केली. पोलीसांना त्याचे मर्म समजताच, खाकीतील माणुसकी जागृत झाली. भांडण करणार्यापैकी एकाला जेवण , त्याला हक्काचा निवाराही मिळवून देत, त्याचे पुर्नवर्सन केले.

आपल्या हद्दीत दुसरा वेडसर आल्याने, शहर पोलीस स्टेशन समोरच ते एकमेकांच्या जीवावर उठले. एकमेकांना यमसदनी पाठविण्याची खूणगाठ मनाशी बांधत एकाने दुसर्याचा खात्मा करण्यासाठी एकदुसर्यावर वार केले. काही कळायच्या आतच त्यांच्यात लथ्थाप्रहार सुरू झाले. एकाने शहर पोलीस स्टेशनच्या आवार भींतीची तक्रार पेटी अखडून दुसर्याचे डोके पॐोडले. पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या पोलीसांच्या लक्षात ही बाब येताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. भांडण आवरून दोघांनाही ताब्यात घेतले. सुरूवातीला पोलीसी खाक्या दाखवित त्यांना वठणीवर आणले. पोलीसांनी भागविली भूकजोरदार भूक लागल्याने आपण त्याच्या परिसरात आल्याचे एकाने पोलीसांना सांिगतले. म्हणून त्याने मारहाण केल्याची वस्तुस्िथती समजताच उपस्थित पोलीसांनी त्याची भूक भागविली. सुरूवातीला प्रपॐुल टेकाडे यांनी त्याला नास्ता करण्यासाठी पैसे दिले. तर डीबी पथकाचे प्रमुख मोहन करूटले यांनी त्याला जेवण आणून दिले. भूक क्षमल्यानंतर पोलीसांनी त्याची व्यथा ऐकली. त्यानंतर त्याचे पुर्नवसन करण्याचे ठरविले.

हक्काचा निवाराही दिला.चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील नंदकिशोर पालवे यांच्या सेवा संकल्प प्रतिष्ठानात प्रवेश मिळवून देत, हक्काचा निवारा मिळवून दिला. अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, शहर पोलीस निरिक्षक शांतीकुमार पाटील यांची विशेष परवानगी घेऊन डीबी पथक प्रमुख मोहन करूटले यांनी सहकार्यांच्या मदतीने त्याला दाखल केले. शहर पोलीसांची विनंती स्वीकारून सेवा संकल्पचे नंदकिशोर पालवे यांनी त्याचा सांभाळ करण्यासाठी नम्रपणे होकार दर्शविला. त्यानंतर आरती पालवे आिण सेवा संकल्पमधील सेवाव्रतींनी एका वेडसराचा स्वीकार केला.

टॅग्स :buldhanaबुलडाणा