शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

बुलडाणा:  जिल्हा परिषदेच्या दहा शाळा होणार 'मॉडेल स्कूल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 12:25 PM

Buldhana, School, Education Sector News जिल्ह्यात १० शाळा मॉडेल म्हणून पुढे येणार असून त्या इतरांसाठी आदर्श ठरतील. 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव/सिंदखेडराजा : राज्यातील जिल्हा परिषदेच्या ३०० शाळा आदर्श करण्याच्या निर्णयानुसार बुलडाणा जिल्ह्यातील १० शाळांचा समावेश करण्यात आला आहे. या शाळा 'मॉडेल स्कूल' म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील तीन तालुके वगळण्यात आले आहेत. मार्च २०२० मध्ये द्वितीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात घोषणा करण्यात आली होती. काही निकषांच्या आधारावर साधारणतः प्रत्येक तालुक्यातून एक अशा ३०० शाळा निवडण्यात आल्या आहेत. निवडलेल्या आदर्श शाळा शक्यतो किमान इयत्ता पहिली ते सातवी वर्गाच्या जिल्हा परिषद शाळा आहेत. आवश्यक असल्यास त्यात आठवीचे वर्ग जोडण्याची मुभा असणार आहे. जिल्ह्यात १० शाळा मॉडेल म्हणून पुढे येणार असून त्या इतरांसाठी आदर्श ठरतील. 

अशी असेल आदर्श शाळा 

 आदर्श शाळा निर्मितीमध्ये तीन महत्त्वाचे भाग आहेत. यात भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि काही प्रशासकीय बाबी यांचा समावेश राहणार आहे. भौतिक सुविधा अंतर्गत स्वतंत्र शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुव्यवस्थित वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडासाहित्य, आयसीटी सायन्स लॅब, ग्रंथालय सुविधांचा समावेश आहे.  शैक्षणिक गुणवत्ता अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी उत्तम शैक्षणिक पोषक वातावरण, वाचनावर भर, वाचनाचा सराव याशिवाय विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर भाषा व गणित विषयातील मूलभूत संकल्पना राबवणे,स्वयं अध्ययनासोबतच गट अध्ययन यासारखे कार्यक्रमही यानिमित्ताने राबविले जाणार आहेत. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रbuldhanaबुलडाणाkhamgaonखामगावSindkhed Rajaसिंदखेड राजाSchoolशाळा