शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : सात मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 15:39 IST

निवडणुकीत सखी, अर्थात महिलांचे, महिलांसाठी आणि महिलांनी चालवलेले मतदान केंद्र ही संकल्पना चांगलीच रूजली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. महिला मतदारांचा मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त सहभाग वाढावा, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात एका सखी मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर असणार आहे.निवडणुकीत सखी, अर्थात महिलांचे, महिलांसाठी आणि महिलांनी चालवलेले मतदान केंद्र ही संकल्पना चांगलीच रूजली आहे. जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघात वाकोडी, बुलडाणा श्री शिवाजी विद्यालय, चिखली नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा, सिंदखेडराजा नगर परिषद उर्दू हायस्कूल, मेहकर मतदारसंघातील विवेकानंद नगर, खामगाव एमजेपी तर जळगाव जामोद मतदारसंघात शिवाजी विद्यालयात सखी मतदान केंद्र कार्यरत राहणार आहे. या केंद्राचे मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष, सहाय्यक म्हणून महिला काम पाहणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका केंद्राची जबाबदारी चार अधिकारी आणि एक कर्मचारी असे एकुण पाच जण सांभाळतील. जिल्ह्यातील सात मतदारसंघांमध्ये कार्यरत सखी मतदान केंद्रावर २८ महिला अधिकारी तर ७ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.सर्व सखी मतदान केंद्रांवर गुलाबी रंगाने सजावट करण्यात येणार आहे. सजावटीमध्ये रांगोळी, पोस्टर्स इत्यादींचा समावेश राहणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलींग पार्टीमध्ये ९ हजार ९५६ पुरूष व ६५३ महिला मनुष्यबळ असणार आहे. जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील मतदार केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

सिंदखेड राजात सर्वाधिक महिलाजिल्ह्यात एकुण २० लाख ३९ हजार ४३५ मतदार आहेत. यापैकी १० लाख ६८ हजार ४०७ पुरुष तर ९ लाख ७१ हजार १९ महिला मतदार आहेत.सर्वाधिक सिंदखेडराजा तर सर्वात कमी महिला मतदारांची संख्या मलकापूर मतदारसंघात आहे. सिंदखेडराजा १ लाख ४६ हजार तर मलकापूर मतदारसंघात १ लाख २६ हजार ७०३ महिला मतदार आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019