शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा: एकाच दिवशी नऊ जणांची कोरोनावर मात; रुग्णालयातून सुटी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 12:57 IST

दोन जून रोजी कोरोनामुक्त झालेल्या नऊ जणांना खामगाव येथील आयसोलेशन कक्षातून सुटी देण्यात आली आहे.

बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढिचा वेग वाढलेला असतानाच दोन जून रोजी कोरोनामुक्त झालेल्या नऊ जणांना खामगाव येथील आयसोलेशन कक्षातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये जळका भडंग येथील आठ व टुनकी येथील एकाचा समावेश आहे.कोरेनावर मात करणाºयांमध्ये पाच पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. खामगाव तालुक्यातील जळका भडंग येथे एकाच दिवशी आठ रुग्ण पॉझिटव्ह आढळून आले होते. पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या एका युवकामुळे ही लागन झाली होती. त्यामुळे छोट्याश्या जळका भडंग गावात नऊ कोरोना बाधीत झाले होते. परिणाणी या गावात समुह संक्रमणाचा धोका निर्माण झाला होता.आरोग्य, महसूल, जि. प. व पोलिस प्रशासनाने येथील परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चांगल्या पद्धतीने केल्याने येथील स्थिती नियंत्रणात येण्यास मदत झाली. परिणामी कोरोनाची लक्षणे नसलेल्या खामगाव आयसोलेशन कक्षातील  उपरोक्त नऊ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. नव्या मार्गदर्शक तत्वानुसार ही सुटी करण्यात आली आहे. या रुग्णांमध्ये तीव्र स्वरुपाचा ताप नसणे, शरीरातील आॅक्सीजनचे प्रमाणही ९५ टक्के असणे अशी सुदृढ आरोग्याची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दरम्यान, संग्रमापूर तालुक्यातील टुनकी येथीलही एकाला सुटी देण्यात आली आहे. त्याचीही प्रकृती ठणठणीत झाल्यामुळे त्याला सुटी देण्यात आली. परिणामी संग्रामपुर तालुक्यातील टुणकी भागातील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे सध्या तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॉब नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यात जर सर्व अहवाल निगेटीव्ह आले तर मंगळवारचा दिवस बुलडाण्यासाठी दिलासा देणारा ठरेल.

४२ व्यक्ती कोरोना मुक्त जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४२ वर पोहोचली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्के झाले आहे. मधल्या काळात जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण वाढल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घसरले होते. ते ४९ टक्क्यांवर आले होते. मात्र मंगळवारी सकाळी नऊ जणांनी कोरोनावर मात केल्याने जिल्ह्यातील कोरोना मुक्त झालेल्यांचा आकडा हा ३३ वरून ४२ वर पोहोचला आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. सध्या २ कोरोना बाधीतांवर शेगाव, खामगाव आणि बुलडाणा येथील कोवीड-१९ रुग्णालयात उपचार करण्यात येत असून रुग्णालयातील सर्व कोरोनाबाधीतांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयीन सुत्रांनी सांगितले. दरम्यान, खामगाव येथून तीन जून रोजी आणखी दोघांना सुटी होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार या रुग्णांना कुठलाही त्रास नसल्यास प्रसंगी त्यांची आयसोलेशन कक्षातून सुटी केल्या जावू शकते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याkhamgaonखामगाव