शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा शहरात सुरू झाले बॅनर युद्ध

By admin | Updated: October 11, 2014 00:02 IST

लाखोची उलाढाल : अधिकृत केवळ १00 फलक

बुलडाणा : निवडणूक प्रचाराचा ज्वर आता चांगलाच वाढला आहे. गाड्या, पोष्टर, बॅनर्स आणि डोअर टु डोअर प्रचार चांगलाच रंगत आहे. बुलडाणा शहरात प्रमुख चौकांसह गल्लीबोळात उमेदवारांचे फ्लेक्स बोर्डचे युद्ध सुरू झाले असून, प्रशासनाकडे नोंद असलेले शहरात लहान-मोठे १00 फ्लेक्स बोर्ड लागलेले आहेत. या माध्यमातून नगरपालिकेला १ लाख ९२ हजार रुपयांचा कर प्राप्त झाला आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरू झाला आहे. तिसर्‍या टप्प्यात उमेदवार साम, दाम, दंड याचा वापर करून आपलेच घोडे समोर काढण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी वेगवेगळ्या प्रचार माध्यमाचा वापर केल्या जातो. यामध्ये सर्वाधिक फ्लेक्स बोर्डचा वापर होत असून, उमेदवाराची छबी, पक्षाचे चिन्ह आणि नेत्यांच्या फोटोचा वापर त्यात केल्या जातो. बुलडाणा शहरात प्रमुख चार चौक आहेत. या चौकात प्रत्येक उमदवारांचे मोठमोठे होर्डिंग्ज लागलेले दिसतात. याशिवाय शहराच्या गल्लीबोळात बॅनर्सचे युद्ध पहावयास मिळत आहे. या बॅनर्स युद्धामध्ये सर्वात आघाडीवर भाजपचे उमेदवार योगेंद्र गोडे आहेत. गोडे यांचे शहरात तब्बल ४२ होर्डिंंग्ज लागलेले आहेत. त्या पाठोपाठ शिवसेनेचे विजयराज शिंदे, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रत्येकी १७ तर मनसेचे संजय गायकवाड यांचे १४ होर्डिंंग्ज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ ८ फ्लेक्स बोर्ड लावलेले आहेत. तर बसपाचे २ आणि अपक्ष उमेदवाराचा १ बोर्ड लागलेला आहे. या फ्लेक्स बोर्डच्या माध्यमातून नगरपालिकेला १ लाख ९२ हजार रुपये कराच्या रूपात पैसा मिळाला आहे.

*अनधिकृत बोर्डाचे काय ?

उमेदवारांनी रितसर परवानगी घेऊन शहरात लावलेल्या फ्लेक्स बोर्डची संख्या १00 असली तरी अनधिकृत बोर्डाची संख्या शहरात शेकडोनी आहे. याची नोंद ठेवणारी यंत्रणा मात्र नगरपालिकेकडे नाही काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेनी ठरविलेले बोर्ड म्हणजेच अधिकृत आहेत, असे असेल तर पालिकेचा लाखो रूपयांचा कर बुडत आहे.