शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

इसरूळच्या नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

By admin | Updated: September 25, 2014 01:14 IST

चिखली तालुक्यातील इसरूळ येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार; चौकशीची मागणी.

बुलडाणा : इसरूळ ता.चिखली येथे मागील वर्षभरात झालेल्या विविध विकास कामात प्रचंड अनियमितता झाली. त्याच्या तक्रारीही वरिष्ठांकडे झाल्या. अधिकार्‍यांनी अनियमितता झाल्याचे अहवालही दिले, मात्र दोषीवर अद्यापही कार्यवाही न झाल्यामुळे आमचा लोकशाही व स्वच्छ प्रशासनावरील विश्‍वास उडाल्याने येत्या १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकीवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकर्‍यांनी घेतल्याचे एक निवेदन इसरूळ येथील नागरीकांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किरण कुरुंदकर यांना दिले आहे. या गावकर्‍यांच्या म्हणण्यानुसार १३ वा वित्त आयोग, दलित वस्ती सुधार योजना आणि ग्रमापंचायतीच्या सामान्य निधितून आलेल्या पैशातील ४ लाख २९ हजार ५0२ रुपयाचा अपहार ग्राम सचिव व सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. या कामाची तक्रार वरिष्ठांना दिली. यावर चौकशी होऊन चौकशी अहवालात दोशी सचिवावर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले. मात्र अद्याप प्रशासनाने संबंधीतावर कोणतीही कारवाई केली नाही. गावातील ७३ भुखंड सामाजिक उदिष्टासाठी ठेवण्यात आले होते.यातील दोन भुखंड ग्रामपंचायत सदस्य ओमप्रकाश भुतेकर आणि पुष्पाबाई भुतेकर यांनी बेकायदेशीरित्या स्वत:च्या नावाने करून घेतले. तर काही भुखंड परस्पर विकण्यात आले. तर ग्रा.पं.सदस्य पती मोहनसिंग वायाळ उपसरपंच पती गणेश भुतेकर यांनी १३ व्या वित्त आयोगातील ५४ हजार रुपयाच्या निधीचा अपहार केला. या प्रकरणाच्या अनेकवेळा तक्रारी केल्या मात्र चौकशी झाली नाही. तेव्हा शासकिय यंत्रणेवरील आमचा विश्‍वास उडाला असून आता निवडणूकीवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यासाठी गावकर्‍यांनी सह्याची मोहिम राबविली. यामध्ये २८२ कुटुंबांनी या प्रस्तावाला संमती दिल्याचे म्हटले आहे. निवेदनावर रंगनाथ भुतेकर, शे.हुसेन, दिलीप भुतेकर, संतोष भुतेकर यांच्यासह गावकर्‍यांच्या सह्या आहेत.