अज्ञात वाहनाच्या धडकेत २७ वर्षीय दुचाकीस्वार ठार, माेहेगाव फाट्याजवळील घटना
By संदीप वानखेडे | Updated: February 25, 2024 21:44 IST2024-02-25T21:44:19+5:302024-02-25T21:44:42+5:30
शैलेश आनंदा लहासे असे मृतकाचे नाव आहे

अज्ञात वाहनाच्या धडकेत २७ वर्षीय दुचाकीस्वार ठार, माेहेगाव फाट्याजवळील घटना
संदीप वानखडे, मोताळा-बुलढाणा: भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने एक जण ठार झाला़ ही घटना २५ फेब्रुवारी राेजी रात्री ८ वाजता माेहेगाव फाट्याजवळ घडली. शैलेश आनंदा लहासे असे मृतकाचे नाव आहे.
तालुक्यातील धामणगाव बढे येथील शैलेश आनंदा लहासे हा २७ वर्षीय युवक आज २५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या एम.एच. २८/ ए. एक्स. / ३५६१ क्रमांकाच्या दुचाकीने बुलढाणा कडून धामणगाव बढे येथे जात हाेता़ दरम्यान रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या दूचाकीला मोहेगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली़ या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते़ घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर महाजन, पोहेकॉ कपिश काशपाग, पोकॉ वैभव खरमाळे, रवींद्र नरोटे, इरफान शेख यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमी दुचाकीस्वारास रुग्णवाहिकेतून बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात हलविले, मात्र, जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.