शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींमुळे देशाची कृषी अर्थव्यवस्था अडचणीत

By admin | Updated: October 10, 2014 00:23 IST

सिंदखेडराजा येथील जाहीर सभेत शरद पवार यांचा आरोप.

मेहकर (बुलडाणा) : मोदींनी सत्तेवर येताच डाळिंब, कांदा व धान्य निर्यातीवर बंदी आणली. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पादनाचे भाव गडगडले आणि या मालासाठी विदेशी बाजारपेठ बंद झाली. कृषी अर्थव्यवस्था अडचणीत आणण्याचे काम मोदी सरकारच्या निर्णयामुळे झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ९ ऑक्टोबर रोजी जिजाऊसृष्टी येथे आयोजित प्रचारसभेत शरद पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी मोदींवर चौफेर टीका केली. भाजपची सत्ता आल्यापासून शेतमालाचे भाव कमी झाले आहेत. साखर निर्यातीवर बंदी आणून शेतकर्‍यांच्या संसाराला चटका देण्याचे काम या सरकारने केले आहे. शेतमालाचे भाव वाढवून शेतकर्‍यांना आधार देण्याची गरज पवार यांनी अधोरेखित केली.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही भ्रष्टाचारी नेते असल्याचा आरोप भाजपने केला होता. पक्षाने लगेच चौकशी करून अशा नेत्यांना बाजूला सारले. आता या भ्रष्ट नेत्यांना भाजपने साथ दिली. हे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तर भ्रष्टाचारी आणि भाजपात गेले तर साधूसंत, असा याचा अर्थ होतो का, असा सवालही पवार यांनी केला.* गुजरातेत विद्यार्थ्यांना शिकविला जातो चुकीचा इतिहासगुजरातमध्ये शालेय स्तरावरील इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबांचे नाव दादोजी कोंडदेव असे छापलेले आहे. ज्या मोदींना छत्रपतींचा इतिहास माहीत नाही, ते महाराष्ट्राच्या दैवताचा मतांसाठी आधार घेत आहेत, असा आरोप पवार यांनी केला.*सरंक्षण सोडून पंतप्रधान प्रचारातभारतीय सीमेवर पाकिस्तान दररोज हल्ले करीत असून, या हल्ल्यांमध्ये देशाचे जवानांना शहीद होत आहेत; परंतु पंतप्रधान तिकडे लक्ष देण्याऐवजी महाराष्ट्रात प्रचार सभांसाठी फिरत आहेत. मोदींना संरक्षण मंत्री नेमायलाही वेळ नसून, देशाच्या संरक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.