मुलीला पळवून नेले म्हणून मारहाण; युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 11:02 IST2021-04-01T11:01:46+5:302021-04-01T11:02:44+5:30

Youth death at Khamgaon : तिघांनी मारहाण केल्यामुळे गंभीर झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Beating for eloped with girl; Death of a youth | मुलीला पळवून नेले म्हणून मारहाण; युवकाचा मृत्यू

मुलीला पळवून नेले म्हणून मारहाण; युवकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: मुलीला पळवून नेल्याच्या रागातून तिघांनी मारहाण केल्यामुळे गंभीर झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. 
तालुक्यातील नागापूर येथील संजय बुंदे याने गावातीलच मुलीला पळवून नेले होते. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, तो ४५ दिवस जेलमध्ये होता. 
त्यानंतर, काही दिवसांनी तो गावी आला असता, रमेश इंगळे, गणेश इंगळे व सतीश इंगळे यांनी त्याला लोखंडी पाइपने मारहाण केली. यावेळी त्याचे वडील रघुनाथ बुंदे  आवरण्यासाठी गेले असता, त्यांनाही मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी सुनील बुंदे याच्या तक्रारीवरून ग्रामीण पोस्टेला कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दरम्यान, या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या संजय बुदे याला उपचारासाठी अकोला येथे भरती करण्यात आले होते. 
मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने मंगळवारी त्याला नागपूर येथे नेण्यात येत होते. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात ३०२चा गुन्हा वाढविण्यात आला असून, तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Beating for eloped with girl; Death of a youth