आता व्हा आत्मनिर्भर; १७८ जणांना मिळणार १० लाखांपर्यंत अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:38 IST2021-09-05T04:38:45+5:302021-09-05T04:38:45+5:30

या योजनेंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी तसेच सामाईक पायाभूत सुविधा केंद्रासाठी ३५ टक्के अनुदान, ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी एकूण खर्चाच्या ५० ...

Be self-reliant now; 178 people will get grants up to 10 lakhs | आता व्हा आत्मनिर्भर; १७८ जणांना मिळणार १० लाखांपर्यंत अनुदान

आता व्हा आत्मनिर्भर; १७८ जणांना मिळणार १० लाखांपर्यंत अनुदान

या योजनेंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी तसेच सामाईक पायाभूत सुविधा केंद्रासाठी ३५ टक्के अनुदान, ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान स्वयंसाहाय्यता गटांना बीज भांडवल तसेच लहान उपकरणे खरेदीसाठी ४० हजार प्रती सभासद याप्रमाणे ४ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या अन्न प्रक्रिया प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी स्थरवृद्धी, आधुनिकीकरण या प्रकल्पांचे प्रस्तावदेखील या योजनेमध्ये सादर करता येतील. या योजनेत १० लाख रुपयांपर्यंत अनुदान प्राप्त होते. यामध्ये केंद्र व राज्य शासन मिळून अनुदान देत आहे.

कोणाला घेता येणार लाभ?

या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, स्वयंसाहाय्यता गट आणि सहकारी उत्पादक तसेच शासन यंत्रणा किंवा खासगी उद्योग इत्यादी घटकांना लाभ घेता येईल. तसेच सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या प्रक्रिया प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी एक जिल्हा एक उत्पादनाच्या व्यतिरिक्त इतर प्रस्तावदेखील या योजनेमध्ये सादर करता येतो.

असा करा अर्ज

वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांनी एमआयएस पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येतात.

गट लाभार्थींनी ऑफलाइन पद्धतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास अर्ज निश्चित केलेल्या एक जिल्हा एक उत्पादनासाठी सादर करता येतील.

जिल्ह्याला प्राप्त उद्दिष्ट लक्ष्यांक प्राप्त अर्ज

सर्वसाधारण प्रवर्गासाठी १६० १४२

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १५ १९

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ३ ५

शेतकरी गट ८ ३

शेतकरी उत्पादक कंपनी २५ ००

जास्तीत जास्त अर्ज करा!

या योजनेंतर्गत जिल्ह्याला १७८ जणांचे लक्ष्यांक मिळाले आहे. तसेच योजनेत निवड झालेल्या लाभार्थींना अनुदान प्राप्त होणार आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत पेरू पिकाची निवड झाली आहे. तरी जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज करावे.

- नरेंद्र नाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा

Web Title: Be self-reliant now; 178 people will get grants up to 10 lakhs