शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

‘चिखली अर्बन’ पुरस्कारने सन्मानित

By admin | Updated: June 13, 2017 00:10 IST

चिखली : सहकाराच्या माध्यमातून आधुनिक व जलद बँकिंगची सेवा ग्राहकांना देणाऱ्या दि चिखली अर्बन को-आॅप. बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : सहकाराच्या माध्यमातून आधुनिक व जलद बँकिंगची सेवा ग्राहकांना देणाऱ्या दि चिखली अर्बन को-आॅप. बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सन २०१६ या आर्थिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विदर्भ अर्बन बँक्स को-आॅप असोसिएशनद्वारे तृतीय पुरस्काराची मानकरी चिखली अर्बन बँक ठरली असून, १० जून रोजी नागपूर येथे झालेल्या समारंभात बँकेला सन्मानित करण्यात आले आहे.आर्थिक वर्ष ३१ मार्च २०१६ रोजी ५०० कोटींपेक्षा जास्त ठेवी असलेल्या बँकेच्या गटातून आर्थिक कामगिरीचा विचार हा पुरस्कार देताना केला जातो. गेल्या आर्थिक वर्षात चिखली अर्बन बँकेने विविध प्रकारच्या ठेवी, वेगवेगळी कर्जे आणि निव्वळ नफ्यात घसघशीत वाढ केली. पारदर्शी कारभार, उत्तम प्रशासन व तत्पर सेवा या वैशिष्ट्यांची पुरस्कार समितीने आवर्जून दखल घेतली होती. त्यानुसार विदर्भ अर्बन बँक्स को-आॅप. असोसिएशनने आयोजित केलेल्या समारंभात आमदार चैनसुख संचेती, असोसिएशनचे अध्यक्ष कैलासचंद्र अग्रवाल, संचालक विठ्ठलदास डागा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दि चिखली अर्बन को-आॅप. बँकेचे उपाध्यक्ष डॉ.गणेश खांडेभराड, संचालक पुरूषोत्तम दिवटे, राजेंद्र शेटे, नरेंद्र लढ्ढा व सरव्यवस्थापक संजय भंगिरे यांनी हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. चिखली अर्बन बँकेच्या या चमकदार कामगिरीबद्दल बँकेचे ग्राहक, खातेदार, भागधारक व हितचिंतकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.