शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्तांचे पुन्हा सर्वेक्षण!

By admin | Updated: May 31, 2017 00:58 IST

नव्याने होणार कर आकारणी; पाच पथक कार्यान्वित

खामगाव: शहरातील मालमत्तांना नव्याने तसेच वाढीव कर आकारणीसाठी पुन्हा सर्वेक्षणास लवकरच प्रारंभ होणार आहे. या सर्वेक्षणासाठी पालिकेतील कर विभागाच्या प्रत्येकी ४-५ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.खामगाव शहरात सुमारे २९ हजार मालमत्ता आहेत. या मालमत्तांमध्ये सुमारे चार हजार खुले भूखंड असून, चार हजारांच्यावर जुन्या मालमत्तांचा समावेश आहे. दरम्यान, उर्वरित २१ हजार मालमत्तांपैकी नवीन दोन हजार मालमत्तांच्या नव्याने कर आकारणीची प्रक्रिया अंतिम टप्यात असून, शहरातील सुमारे १९ हजारांवर मालमत्तांना अद्यापही जुन्याच पद्धतीने कर आकारणी केल्या जात आहे. दरम्यान, आता या मालमत्तांना नव्याने, वाढीव कर आकारणीसाठी फेर सर्व्हेक्षण करण्यात येणार असून, नवीन कर आकारणीबाबतीत पालिका कर्मचाऱ्यांना वरिष्ठ स्तरावरून निर्देश देण्यात आले आहेत. येत्या आठवड्यात या सर्वेक्षणास सुरुवात झाल्यानंतर महिनाभराच्या कालावधीत संपूर्ण शहरातील मालमत्तांच्या फेर सर्वेक्षणाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. खामगाव नगरपालिकेने यावर्षी प्रथमच अपेक्षित उद्दिष्टपूर्ती गाठली असून, आता फेर सर्वेक्षणाद्वारे नव्याने तसेच वाढीव दराने कर आकारणी करून पालिका प्रशासनाचे उत्पन्न वाढविण्यासाठी पालका प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहे. त्यानुषंगाने कर विभागाला कामाला लागण्याचे निर्देश मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. यासंदर्भात कर विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची बैठकही मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात सोमवारी पार पडली. यावेळी कामात कुचराई न करण्याचे निर्देशही मुख्याधिकाऱ्यांनी कर विभागातील कर्मचाऱ्यांना दिले.इतर विभागाचीही घेणार मदत!नव्याने कर आकारणीसाठी शहरातील मालमत्तांच्या सर्वेक्षणासाठी कर विभागातील कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात येणार असले, तरी सर्वेक्षणात पारदर्शकता येण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर पालिकेतील इतर विभागातील कर्मचाऱ्यांचाही या पथकात समावेश केल्या जाणार असल्याची माहिती आहे.