शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
3
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
4
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
5
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
6
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
7
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
8
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
9
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
10
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
11
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
13
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
14
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
15
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
16
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
17
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
18
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
19
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
20
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...

बुलडाणा जिल्हय़ात कपाशीच्या बाधित क्षेत्राचा कृषी विभागाकडून सर्व्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:47 AM

गुलाबी-सेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील  हजारो कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या संभाव्य नुकसानाची शक्यता लक्षात घेता,  सर्वेक्षण तसेच प्रत्यक्ष भेटीच्या आधारे बाधित क्षेत्राची  माहिती कृषी  विभागाकडून गोळा केली जात आहे.

ठळक मुद्देबोंडअळीचा प्रादुर्भाव अर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांची गर्दी; १८ हजार अर्ज प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/खामगाव : गुलाबी-सेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील  हजारो कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या संभाव्य नुकसानाची शक्यता लक्षात घेता,  सर्वेक्षण तसेच प्रत्यक्ष भेटीच्या आधारे बाधित क्षेत्राची  माहिती कृषी  विभागाकडून गोळा केली जात आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत  १८ हजार २५0 शेतकर्‍यांनी यासंदर्भात अर्ज केले आहेत. जिल्ह्यात दररोज  सरासरी तीन हजार अर्ज याप्रकरणी कृषी विभागास प्राप्त होत असल्याची माहि ती सूत्रांनी दिली.दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात कापसाचे सरासरी क्षेत्र हे दोन लाख ४४ हजार  ४३0 हेक्टर आहे. यापैकी प्रत्यक्षात जिल्ह्यात यावर्षी एक लाख ७५ हजार  पाच हेक्टरवर कापसाची लागवड झालेली आहे. यापैकी जवळपास सव्वा  लाख हेक्टरवर कपाशी शेंदरी अळीमुळे धोक्यात आली आहे.सध्या जिल्ह्यात कृषीसेवक प्रत्यक्ष शेतकर्‍यांना भेटून त्यांच्याकडून याबाबतचे  अर्ज भरून घेत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात घाटावर काही मोजक्या तालुक्यात  आणि घाटाखाली मलकापूर, मोताळा, नांदुरा, खामगाव, शेगाव, जळगाव  जामोद, संग्रामपूर तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर कपाशीचा पेरा झाला आहे. या  सर्व भागात या बोंडअळीची समस्या निर्माण झाली आहे.  कृषी विभागानेही  यासंदर्भात आवाहन करून शेतकर्‍यांनी नमुना जीमध्ये माहिती भरून अर्ज  देण्याचे आवाहन केले होते. त्यानुषंगाने खामगाव उपविभागातील शेकडो शे तकर्‍यांनी गुरुवारी कृषी कार्यालयात गर्दी केली होती.खामगाव उपविभागांतर्गत खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद आणि  संग्रामपूर या पाच तालुक्यातील ५६0 गावांमधील हजारो शेतकर्‍यांनी ८३ हजार  ८४१ हेक्टरवर कपाशीचा पेरा केला होता. दरम्यान,  ऐन बहरात असतानाच  ऑगस्ट महिन्यात गुलाबी-सेंदरी बोंडअळीने कपाशी पिकावर हल्ला चढविला.  बोंडअळीच्या हल्ल्यामुळे  जिल्ह्यातील एकूण एक लाख ७५ हजार क्षेत्रापैकी  सुमारे १ लाख ३५ हजार हेक्टरवरील कपाशी धोक्यात असल्याचा संभाव्य  अंदाज लक्षात घेता, प्रत्यक्ष बाधित क्षेत्राच्या पाहणीसाठी गेल्या आठ दिवसां पासून कृषी विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रत्यक्ष बुलडाणा येथील  कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  सद्यस्थितीत प्राप्त अर्जानुसार १५ हजार हेक्टरवरील कपाशीच्या पिकाचे मोठे  नुकसान झाले आहे. येत्या काळात हा आकडा सातत्याने वाढता राहणार  असल्याचे संकेतही सूत्रांनी दिले. त्यामुळे उपविभागीय कृषी विभागाची पथके  गावपातळीवर पाठविण्यात आली आहेत.  त्याचप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांकडून विहित नमुन्यात कृषी केंद्राचे बिल  आणि पेरणी केलेल्या कपाशीच्या पिशवीसह अर्ज मागविण्यात आले आहेत.  दरम्यान, हिवाळी अधिवेशनात नुकसानीच्या मदतीची घोषणा केली जाण्याची  संभाव्य शक्यता लक्षात घेता, संबंधित कृषी कार्यालयात शेतकर्‍यांची गर्दी दिसून  येते. कापूस वेचणीला गेले असता ही मोठी अडचण येत आहे.

बोंडअळीमुळे उत्पादनावर परिणाम!कपाशीच्या पेरणीनंतर साधारणपणे ९0 दिवसांनंतर गुलाबी-सेंदरी बोंडअळीचा  हल्ला होतो; मात्र यावर्षी ऑगस्टमध्येच या बोंडअळीने हल्ला केल्याचे आढळून  आले. ही अळी सरकी खाणारी असल्याने, कापसाची प्रत खराब होते. त्यामुळे  कपाशीच्या उत्पादनावर मोठा परिणाम होतो. 

कामाचा ताणबुलडाणा जिल्ह्यात जवळपास ३५0 कृषी सहायक कार्यरत आहेत.  भौगोलिकदृष्ट्या जिल्हा मोठा असून, १३ तालुक्याचा आहे. त्यामुळे या  कामासह अन्य कामे करण्यात कृषी सहायकांची दमछाक होत आहे. त्यामुळे  या कामात ग्रामसेवक आणि तलाठी वर्गालाही समाविष्ट करण्याची गरज व्यक् त केली जात आहे.

गुलाबी- सेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे बाधित क्षेत्राच्या माहितीसाठी  सर्वेक्षण सुरू केले आहे. यासाठी गावपातळीवर भेटी दिल्या जात आहेत. त्याच प्रमाणे शेतकर्‍यांकडूनही अर्ज मागविण्यात आले आहेत. - एन.के. राऊतउपविभागीय कृषी अधिकारी, खामगाव. 

टॅग्स :cottonकापूसbuldhana residenceबुलडाणा रेसीडन्सी