शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षानंतर शाळाबाह्य विद्यार्थ्यांंचे सर्वेक्षण

By admin | Updated: July 3, 2015 23:51 IST

५ हजार कर्मचा-यांची चमू सज्ज; बुलडाणा जिल्ह्यात २२ अधिकृत मरदसे.

बुलडाणा : राज्य शासनाच्या निर्देशानुसार ४ जुलै रोजी होऊ घातलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात ५ हजार ७१७ कर्मचारी तैनात करण्यात आले असून, सकाळी ७ वाजेपासून सर्वेक्षणाला सुरुवात होत आहे. यापूर्वी २00६ मध्ये शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल नऊ वर्षानंतर हे सर्वेक्षण होत आहे. मागील वेळी केवळ ५४२ शाळाबाह्य मुलांची नोंद करण्यात आली होती. यावर्षीच्या सर्वेक्षणात यामध्ये मोठी वाढ होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने खबरदारी घेण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक गावासह शहरातील प्रत्येक घरी, प्रत्येक वस्तीत, तांड्यात जाऊन हे सर्वेक्षण होत आहे. यात शाळाबाह्य आढळलेल्या मुलाच्या हाताला शाई लावून त्याला शाळेत प्रवेशित करण्यात येणार आहे. एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत समिती तयार करण्यात आली आहे. या समितीत शिक्षण व महसूल विभागाच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. याच पद्धतीने तालुकास्तरावर समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. या समित्यामध्ये सचिव म्हणून तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी काम सांभाळणार आहेत. सकाळी ७ सायंकाळी ७ वाजेपर्यंंत घरोघरी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणी,आठवडी बाजार, वीटभट्टय़ा, बांधकामे, झोपडपट्टी, वस्तू विकणारी तसेच भीक मागणारी मुले आदी ठिकाणी शाळाबाहय़ मुलांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश आहे.

*यापूर्वी केवळ ५४२ विद्यार्थ्यांंचा समावेश

यापूर्वी जिल्ह्यात सन २00६ मध्ये शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण झाले होते. हे सर्वेक्षणसुद्धा एकाच दिवशी एकाच वेळी करण्यात आले होते. या सर्वेक्षणात ५४२ शाळाबाह्य मुले आढळून आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियान विभागाच्यावतीने देण्यात आली. यावर्षी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

*जिल्ह्यात २२ अधिकृत मदरसे

  यावर्षीच्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणामध्ये शासनाने आमूलाग्र बदल केले आहेत. त्यामुळे या सर्वेक्षणामध्ये शाळाबाह्य मुलांचे आकडे वाढणार आहे. जो विद्यार्थी सतत दोन महिने शाळेत गैरहजर राहिला त्यालाही शाळाबाह्य मुलांमध्ये गणल्या जाणार आहे. तर मदरशामध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांंचाही शाळाबाह्य मुलांमध्ये समावेश करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात अधिकृत २२ मदरसे आहेत. त्यांची नोंद वक्फ बोर्डाकडे आहे. या मदरशामध्ये २ ते ३ हजार विद्यार्थी असतील असा अंदाज काढण्यात आला आहे. याशिवाय अधिकृत नोंद नसलेले मरदसेसुद्धा जिल्ह्यात आहेत; मात्र त्याबद्दल प्रशासनाकडे माहिती नाही.