शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणमुक्तीसोबतच जलयुक्त शिवाराला प्राधान्य

By admin | Updated: January 17, 2015 00:15 IST

बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांची ग्वाही.

बुलडाणा : दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी राज्यशासन उपाययोजना करीत असून, जिल्हा परिषदेच्या मार्फतही या अभियानासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. जलयुक्तशिवार ही योजना प्रभावीपणे राबविताना कुपोषण मुक्तीला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी दिली.बुलडाणा जिल्हा परिषदेचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. जलयुक्त शिवार अभियानात गावांची निवड झाली आहे. आता या कामाला अधिक गती देण्याची गरज आहे. जलसंधारणाची कामे जिल्हाभरात खूप मोठय़ा प्रमाणात झाल्याची मला माहिती मिळाली आहे, त्यामुळे आगामी काळात जलयुक्तशिवार योजना राबविताना अडचणी येणार नाहीत, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.चंद्रपूर जिल्ह्यात मी उपविभागीय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. माझ्या कामाचा भाग नसतानाही कुपोषणमुक्तीसाठी अनेक योजनांना गतिमान केले, त्यामुळे जिल्हा परिषदेसारख्या ग्रामीण यंत्रणेत आता या विषयावर लक्ष केंद्रित करणार आहे. कुपोषण मुक्तीसाठी अनेक चांगल्या योजना आहेत; मात्र त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही, याची जाण असल्याने सर्व अधिकार्‍यांना विश्‍वासात घेऊन काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. *पहिल्याच दिवशी घेतला कामाचा आढावामुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून शुक्रवारी रूजू होताच दीपा मुधोळ यांनी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला. कार्यालयीन शिस्त व स्वच्छता यावर भर देतानाच नियोजित वेळेत कामे पूर्ण होतील, असा प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी खातेप्रमुखांना दिले.