शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेती वाहतूक करणा-या ५ वाहनांवर कारवाई

By admin | Updated: November 24, 2014 00:44 IST

खामगाव येथे महसुल विभागाच्या पथकाची कारवाई, ६५ हजार रुपयांचा दंड वसूल.

खामगाव (बुलडाणा): येथील तहसीलदार ए.एन. टेंभरे यांच्या मार्गदर्शनात महसूल विभागाच्या पथकाने आज अवैधरित्या रेतीची वाहतूक करणार्‍या ५ वाहनांना पकडून त्यांच्याकडून ६४ हजार ६00 रुपये दंड वसूल करुन शासनजमा करण्यात आला.नांदुरा परिसरातून अवैधरित्या उत्खनन करुन खामगाव शहरात मोठय़ा प्रमाणात रेती आणल्या जात आहे. याबाबतची माहिती तहसीलदार ए.एन.टेंभरे यांना मिळाली होती. त्याआधारे आज २३ नोव्हेंबर रोजी स्थानिक महसूल विभागाच्या पथकातील मंडळ अधिकारी विजय कुळकर्णी व सूर्यकांत सातपुते आदींनी आज पाळत ठेवली असता टिप्पर क्रमांक एमएच २८ बी ८९0२, एमएच २८ एबी ७४0७, एमएच २८ एबी ७0८९, एमएच २१ एक्स १६९६ या वाहनातून अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. या वाहनांमधून प्रत्येकी २ ब्रास रेती आढळून आली. त्यामुळे त्यांच्याकडून प्रत्येकी १३ हजार ८00 रुपये याप्रमाणे ५५ हजार २00 रुपये असा दंड करण्यात आला. तसेच ट्रॅक्टर क्रमांक एमएच २८- ९२८२ या वाहनातूनही अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असताना पकडण्यात आले. या ट्रॅक्टरधारकाकडून ९ हजार ४00 रूपये दंड वसूल करण्यात येवून शासनजमा करण्यात आला आहे. जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर अवैध रेती वाहतुक सुरू असून या माध्यमातून कोट्यावधी रूपयाची उलाढाल सुरू असताना प्रशासन मात्र बघ्याची भुमिका घेत आहे.