शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

मनोरूग्णावर अ‍ॅसीड हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 1:16 PM

एका मनोरूग्णावर अज्ञात समाजकंटकांनी अ‍ॅसीड टाकल्याचा संतापजनक प्रकार १० जुलै रोजी उघडकीस आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : तालुक्यातील शेळगाव आटोळ येथे एका मनोरूग्णावर अज्ञात समाजकंटकांनी अ‍ॅसीड टाकल्याचा संतापजनक प्रकार १० जुलै रोजी उघडकीस आला आहे. या अ‍ॅसीड हल्ल्यात सदर मनोरूग्ण गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्या हाताला व पाठीला दुखापत झाली आहे. शेळगाव आटोळ येथील काही सुजान ग्रामस्थांनी तातडीने त्यास बुलडाणा येथे उपचारार्थ हलविले आहे. दरम्यान, या प्रकाराने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.तालुक्यातील शेळगाव आटोळ येथे काही दिवसांपासून एक मनोरूग्ण व्यक्ती राहत आहे. कुणाला त्रास नाही, कुणाला शिवीगाळ नाही, आपल्याच धुंदीत तो राहत होता. मात्र, ९ जुलैच्या रात्री काही अज्ञात लोकांनी त्याच्या अंगावर बॅटरीतील अ‍ॅसिड ओतले. यामध्ये त्याच्या पाठीचा भाग व दोन्ही हात भाजले आहेत. १० जुलैच्या सकाळी गावातील अनिल जºहाडे यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी सेवासंकल्पचे नंदकुमार पालवे यांना माहिती दिली व मनोरूग्णास उपचारार्थ रूग्णालयात ग्रामस्थांच्या मदतीने हलवले. ग्रामस्थांनी वर्गणी करून तातडीने काही रक्कम उभी केली व रुग्णवाहिका बोलावून त्यास बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी बेवारस रूग्णांचे मायबाप म्हणून ओखल्या जाणारे डॉ.विजय निकाळे हे त्याच्यावर उपचार करत आहेत. शेळगाव आटोळ येथील भारत बोर्डे, सर्जेराव जाधव, प्रकाश बोराडे, सागर आराख, अंकुश आटोळे, गणेश घोडके, दौलत जेठे, लिंबा आरक, सागर बोर्डे, शरद सुरकर, गुलाब जाधव, संतोष उत्तम बोराडे व इतर ग्रामस्थांनी मनोरूग्णाप्रती आस्था दर्शवित माणूसकीचे दर्शन घडवून दिले आहेत. दरम्यान जिल्हा सामान्य रूग्णालयातील उपचाराअंती पुढील जबाबदारी नंदकुमार पालवे यांनी स्वीकारली असून उपचाराची दिशा ठरल्यानंतर सदर मनोरूग्णास सेवासंकल्प वर दाखल केले जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी