शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या जाळय़ात

By admin | Updated: November 7, 2014 23:22 IST

काळेगाव (तपोवन) येथील खून प्रकरण; आरोपीस न्यायालयीन कोठडी.

मोताळा ( बुलडाणा) : धामणगाव बढे पोलिस स्टेशन अतंर्गत येत असलेल्या काळेगाव (तपोवन) येथील खून प्रकरण व इतर ठिकाणच्या मोटारसायकली चोरी प्रकरणात कुख्यात असलेला विजय ऊर्फ पिंट्या काकर याला धामणगाव बढे पोलिसांनी तेलंगाणा जिल्हा आदिलाबाद येथून ताब्यात घेतले आहे.या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की धा. बढे पोस्टे अंतर्गत काळेगाव तपोवन येथील भगवान कुईटे या इसमावर सन २0११ मध्ये पिंट्या काकर व त्याच्या दोन साथीदारांनी हल्ला करून जबर मारहाण केली होती. या घटनेत उपचारादरम्यान भगवान कुईटे यांचा मृत्यू झाला होता. सदर प्रकरणी धामणगाव बढे पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी या प्रकरणातील दोन आरोपींना धा. बढे पोलिसांनी अटक केली होती. ते जामिनावर आहेत; मात्र पिंट्या काकर हा तेव्हापासून फरार झाला होता. चोरीच्या व खुनाच्या प्रकरणात तो पोलिसांना अनेक दिवसांपासून वाँटेड होता. काही दिवसांपूर्वी पिंट्या काकर याला तेलंगाणा राज्यातील पोलिसांनी बुलडाणा जिल्हय़ातील १0 मोटारसायकली चोरी करून जवळ बाळगल्याप्रकरणी अटक केली व आदिलाबाद जिल्हय़ातील बोथ तालुक्यांतर्गत हातणूर बाजार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. आदिलाबादचे जिल्हा पोलिस अधिकारी यांनी याबाबत बुलडाणा जिल्हा पोलिस अधिकारी यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख यांच्या सहकार्याने ठाणेदार सेवानंद वानखडेसह कर्मचारी ताराचंद राठोड व शिवशंकर वायाळ यांनी तेलंगाणा राज्यात जाऊन खून व इतर गुन्हय़ात वाँटेड असलेल्या विजय ऊर्फ पिंट्या काकर याला ताब्यात घेतले. शुक्रवार ७ नोव्हेंबर रोजी या आरोपीला कोर्टासमोर हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावली गेल्याची माहिती धा. बढे पोलिसांनी दिली आहे.