शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

वार्षिक सरासरीच्या ९ टक्के परतीचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 2:55 PM

परतीच्या पावसामुळे जिल्ह्याची वार्षिक सरासरी ही जवळपास आठ टक्क्यांनी वाढली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: परतीच्या पावसाने यंदा जिल्ह्यात कहर केला असून वार्षिक सरासरीशी तुलना करता ९ टक्क्यां्या जवळपास हा पाऊस बरसला आहे. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान केले असून शेतकऱ्याच्या हाताशी आलेल्या पिकाला मोठा फटका बसला आहे.बुलडाणा जिल्ह्यात सरासरी ६६७.८ टक्के पाऊस पडतो. मात्र यंदा पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून २८ आॅक्टोबर रोजी झालेल्या नोंदीनुसार ११३.४३ टक्के पाऊस बरसला आहे. दरम्यान, १९ आॅक्टोबर ते २८ आॅक्टोबर दरम्यान पडलेल्या पावसाचा विचार करता परतीच्या या पावसाने जिल्ह्यात सरासरी ५७.५७ मिमी पर्यंत हजेरी लावली. प्रामुख्याने सरासरी पाऊस कमी पडलेल्या देऊळगाव राजा, सिंदखे राजा तालुक्यात हा पाऊस दमदार बरसला आहे. त्यामुळे मात्र शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन, मूग, उडीद अशा पिकांचे मोठे नुकसान या पावसाने केले आहे.सोंगून ठेवलेल्या धान्यालाच या पावसामुळे कोंब फुटले आहे. त्यामुळे गेली तीन वर्षे अवर्षणाचा फटका सहन करणाºया शेतकºयाला यंदा या अतिरिक्त पडलेल्या पावसामुळे झटका दिला आहे. त्यामुळे श्ोतकरी वर्ग आर्थिक दृष्ट्या अडचणीत आला आहे. पावसाळा संपल्यानंतर बुलडणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १०५.५२ टक्के पाऊस पडला होता. मात्र त्यानंतर आलेल्या या परतीच्या पावसामुळे जिल्ह्याची वार्षिक सरासरी ही जवळपास आठ टक्क्यांनी वाढली. यावरून प्रत्यक्ष शेतशिवारात किती पाऊस पडला आहे, याची कल्पना यावी. २१ वर्षांनंतर दीपोत्सवात पाऊसजिल्ह्यात तब्बल २१ वर्षांनंतर दीपोत्सवात परतीच्या पावसाने हजेरी लावलेली आहे. यापूर्वी १९९८ मध्ये असाच पाऊस बरसला होता. त्यावेळी एलनिनोच्या प्रभावामुले अगदी नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात पाऊस बरसत होता. त्यावेळीही पिकांचे मोठे नुकसान झाले होते, असे जाणकार सांगतात. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस