शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

८४७ बालकांना मिळाला जगण्याचा नवा मार्ग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:49 IST

बुलडाणा : हरवलेल्या, वाट चुकलेल्या, भीक मागून उदरनिर्वाह करणार्‍या बालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून १ जुलैपासून ‘ऑपरेशन मुस्कान’ हाती घेण्यात आले होते. महिनाभर राबविण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये जिल्हाभरातून ८४७  बालकांचा शोध लावून त्यांना त्यांचे आई-वडील, कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याने वाट चुकलेल्या या बालकांना जगण्याचा नवा मार्ग मिळाला.  

ठळक मुद्दे‘आपरेशन मुस्कान’ : वाट चुकलेल्या मुलांचा लागला शोध शोध लागलेले बालक : मुली - ३८९, मुले - ४५८

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : हरवलेल्या, वाट चुकलेल्या, भीक मागून उदरनिर्वाह करणार्‍या बालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून १ जुलैपासून ‘ऑपरेशन मुस्कान’ हाती घेण्यात आले होते. महिनाभर राबविण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये जिल्हाभरातून ८४७  बालकांचा शोध लावून त्यांना त्यांचे आई-वडील, कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याने वाट चुकलेल्या या बालकांना जगण्याचा नवा मार्ग मिळाला.  वाट चुकलेले, भीक मागून उदरनिर्वाह करणारे, बालकामगार अशा मुलांचा शोध घेण्यासाठी केंद्र शासनाने विशेष मोहीम उघडली आहे. गेल्या तीन वर्षापासून ‘ऑपरेशन मुस्कान’ या नावाने पोलिस स्टेशन व विशेष पथकाकडून ही मोहीम राबविली जाते. अल्पवयीन मुले हरवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हरवलेल्या मुलांना सुखरूप शोधणे व आई-वडिलांच्या ताब्यात देणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे बेपत्ता मुलांना शोधणे आणि त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य ‘ऑपरेशन मुस्कान’ या मोहीमेच्या माध्यमातून पार पाडले जात आहे.  १ ते ३0 ऑगस्ट २0१५ मध्ये सुरूवातीला मुस्कान मोहिम हाती घेण्यात आली होती. त्यामध्ये २३८ बालकांचा शोध लागला होता. त्यानंतर २0१६ या वर्षामध्ये जानेवारी, एप्रिल व जून महिन्यात पुन्हा ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आले असता जानेवारीमध्ये ४५४, एप्रिलमध्ये १११ व जून मध्ये ४0४ बालकांचा शोध लागला. एका वर्षानंतर पुन्हा १ ते ३१ जुलै या कालावधीमध्ये ऑपरेशन मुस्कान हाती घेण्यात आले. या मोहिमेदरम्यान विविध संस्था, सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल, दुकाने, धार्मिक स्थळे, आश्रम, रेल्वेस्थानक, बसस्थानक आदी ठिकाणची व भीक मागणार्‍या मुलांची चौकशी करण्यात आली. जिल्ह्यात महिनाभर राबविण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कानमुळे वाट चुकलेल्या, भीक मागून उदरनिर्वाह करत असलेल्या ८४७ बालकांचा शोध लावण्यात पोलिसांना यश मिळाले. यामध्ये ४५८ मुले व ३८९ मुलींचा समावेश आहे. हरवलेल्या या बालकांना त्यांचे आई-वडील, कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आले. 

यांनी राबविली मोहीमजिल्ह्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहीम राबविण्यात आली. या पथकामध्ये जिल्हा पोलिस अधिक्षक शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली, एएसपी संदीप डोईफोडे, एल.सी.बी. पीआय प्रतापसिंग शिखारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पी.एस.इंडोळे, जिल्हा पथक प्रमुख तथा जिल्हा बालसंरक्षण अधिकारी शहानवाज खान, पोउनी शेषराव अंभोरे, गजानन चतूर, विलास काकड, अविनाश जाधव, कल्पना हिवाळे व चालक पोहकॉ विजय उभाळे यांचा समावेश होता. तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली.