ऑटो डील मधील ८ दुचाकी अज्ञाताने पेटविल्या, खामगाव शेगाव रोडवरील मध्यरात्रीची घटना
By अनिल गवई | Updated: May 10, 2024 16:42 IST2024-05-10T16:42:35+5:302024-05-10T16:42:57+5:30
प्राप्त माहितीनुसार, ताज नगरातील नसरूल्ला खान कुदरत उल्ला खान ३६ यांच्या मालकीचे शेगाव रोडवर ऑटो डील आहे.

ऑटो डील मधील ८ दुचाकी अज्ञाताने पेटविल्या, खामगाव शेगाव रोडवरील मध्यरात्रीची घटना
खामगाव: शहरातील एका ऑटोडील मधील आठ दुचाकी अज्ञाताने पेटवून दिल्या. शेगाव रोडवरील शर्मा टर्निंग जवळ ही घटना मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, ताज नगरातील नसरूल्ला खान कुदरत उल्ला खान ३६ यांच्या मालकीचे शेगाव रोडवर ऑटो डील आहे. या आटोडीलमध्ये आठ वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकी ठेवल्या होत्या. दरम्यान, मध्यरात्री कुणीतरी खोडसाळपणे या दुचाकीला आग लावून पेटवून दिल्या. त्यामुळे खान यांचे सुमारे दोन ते अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले. एकाच दुकानातील आठ दुचाकी जळून खाक झाल्यामुळे शेगाव रोडवर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खामगाव शहर पोलीसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.