554 crore of crop loan reconstructed | ५५४ कोटी रुपयांच्या कर्जाचे होणार पूनर्गठन
५५४ कोटी रुपयांच्या कर्जाचे होणार पूनर्गठन


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: अवर्षणाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांकडील कर्जाच्या वसुलीस स्थिगिती देण्यात आलेली असून यंदा जवळपास ५५४ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे पूनर्गठन करावे लागणार आहे. दरम्यान, इच्छूक शेतकर्यांना प्रथमत: बँकांकडे तसा अर्ज करावा लागणार आहे. दुसरीकडे शेतकरी कर्जमाफी योजनेतंर्गत दोन लाख २८ हजार १४९ शेतकर्यांचे ९९८ कोटी रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
बुलडाणा जिल्ह्यातील आठ तालुक्यात दुष्काळ तर पाच तालुक्यात दृष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या हातून खरीपाचा हंगाम गेला आहे. अशा स्थितीत कर्ज वसुलीस २१ डिसेंबर २०१८ रोजीच जिल्ह्यातील शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली होती तर दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकर्यांच्या पीक कर्जाचे पूनर्गठनाचे निर्देश देण्यात आले होते. पुणे येथील सहकारी संस्था कार्यालयातील कृषीपत विभागाचे उपनबिंधक डॉ. एस. एन.जाधव यांनी यासंदर्भात उपरोक्त आदेश निर्गमित केले होते. दरम्यान, प्रारंभी राज्यातील १८० तालुक्यात ट्रीगर २ लागू झाला होता. त्यानंतर दुष्काळी उपाययोजना करण्यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आले होते.
त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनानेही दुष्काळी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. दुष्काळी परिस्थिती द्यावयाच्या प्रमुख आठ सुविधांचा विचार करता खरीप हगांमातील कर्ज पूनर्गठन करण्यास प्राधान्य देण्यात आले होते.
३१ मार्च २०१९ पर्यंत बाधीत गावातील जे शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत अशा शेतकर्यांची संमती घेऊन खरीप हंगाम २०१८ मधील पीक कर्जाचे व्याजासह मध्यम मुदती कर्जात पाच वर्षाच्या कालावधीसाठी पूनर्गठन करण्याबात सुचीत करण्यात आले होते. सोबतच अशा शेतकर्यांना पुढील हंगामासाठीही पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्याही सुचना देण्यात आलेल्या होत्या.


Web Title: 554 crore of crop loan reconstructed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.