शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ४२३ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप

By admin | Updated: July 3, 2015 23:47 IST

१५ जुलैपर्यंंत पुन्हा मुदतवाढ; उद्दिष्टपूर्ण न करणा-या बँकांवर होणार दंडात्मक कारवाई.

बुलडाणा : मागील ३0 जूनपर्यंंंत शंभर टक्के पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट बँकांना दिले असताना आतापर्यंंत केवळ ४२३ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. हे प्रमाण दिलेल्या उद्दिष्टांच्या ३४ टक्के आहे. आता पुन्हा कर्जवाटपाला मुदतवाढ दिली असून, १५ जुलैपर्यंंंत उद्दिष्टपूर्ती करण्यात येईल, असा अशावाद अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक पी.एम. शेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील अग्रणी बँकेच्या सभागृहात ३ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते. यावर्षी बुलडाणा जिल्ह्यातील ७८ हजार ८४८ शेतकर्‍यांना १२५0 कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट ३0 जूनपर्यंंंत पूर्ण करायचे होते.; मात्र खासगी तसेच शासकीय बँकांनी शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटपाबद्दलची दाखविलेली अनस्था यामुळे उद्दिष्टपूर्ती होऊ शकली नाही. यासंदर्भात महिती देताना शेंडे म्हणाले की, ज्या बँकांनी उद्दिष्टपूर्ती केली नाही त्या बँकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. मागील वर्षी ३७५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यावेळी ५१ टक्के वाटप झाले होते. यावर्षी किमान ६0 टक्के वाटप होईल, यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळणार असल्याचे ते म्हणाले.

*सर्वाधिक वाटप विदर्भ कोकण बँक

    आतापर्यंंत सर्वाधिक पीक कर्जवाटप विदर्भ कोकण बँकेने केले. बँक ऑफ इंडियाने ३0 टक्के, बँक ऑफ बडोदा ३५ टक्के, बँक ऑफ महाराष्ट्र ३१ टक्के, स्टेट बँके ने ३४ टक्के आणि सेंट्रल बँकेने ३५ टक्के कर्ज वाटप केले. तर विदर्भ कोकण बँकेने सर्वाधिक ४९ टक्के वाटप केले. इतर बँकेने मात्र जेमतेम २0 टक्क्यांपर्यंंतच वाटप केल्याची माहिती शेंडे यांनी दिली.

*पुनर्गठन केवळ १४२ कोटींचे

   जिल्ह्यातील ७८ हजार ८४८ शेतकर्‍यांपैकी आतापर्यंंत २४ हजार २२९ शेतकर्‍यांच्या १४२.२९ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे बँकांनी पुनर्गठन केले. तर ६४ हजार ६१९ शेतकर्‍यांनी आपल्या कर्जाचे नूतनीकरण केल्याची माहिती पी.एम. शेंडे यांनी दिली. वास्तविक पुनर्गठन यापेक्षा जास्त करावयास हवे होते; मात्र बँका तेही पूर्ण करू शकल्या नाही.