शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

३६४ शाळाबाह्य मुले शाळेत!

By admin | Updated: September 30, 2015 00:37 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ६६८ शालाबाह्य मुलांपैकी ६३४ मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळाला असून उर्वरित मुलांना शोधण्याची गरज.

हर्षनंदन वाघ /बुलडाणा : एकही मूल शाळाबाह्य राहू नये, यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मागील काही महिन्यांपूर्वी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यावेळी सुमारे ६६८ मुले आढळून आली होती. यापैकी ३६४ मुलांना वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. तर उर्वरित मुले शाळेत येण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहेत. प्रत्येक मुला-मुलींना शिक्षण मिळाले पाहिजे, या उद्देशाने शासनाकडून विविध योजना, उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. असे असले तरी विविध कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी शाळेचे तोंडही पाहिलेले नव्हते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने जिल्ह्यात अशी शाळाबाह्य विद्यार्थी किती आहेत? याचा शोध घेण्याचे निर्देशित केले होते. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून या कामासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांची नेमणूक करून ४ जुलै रोजी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या दिवशी जिल्हाभरात मिळून सुमारे ६६२ मुले शाळाबाह्य असल्याचे समोर आले होते. त्यात बुलडाणा तालुक्यात एकूण २९ शाळाबाह्य मुले आढळली, त्यात २१ मुले, ८ मुली आहेत. चिखली तालुक्यात एकूण ४२. मुले २0, मुली २१, देऊळगाव राजा एकूण १२. मुले ८, मुली ४, सिंदखेडराजा एकूण १४. मुले ७, मुली ७, लोणार एकूण ४0. मुले १९, मुली २१, मेहकर एकूण १0. मुले ४, मुली ६, खामगाव एकूण १९४. मुले ११३, मुली ८१, शेगाव एकूण ४0. मुले ३१, मुली ९, संग्रामपूर एकूण १६९. मुले ८७, मुली ८२, जळगाव जामोद एकूण ३0. मुले ९ , मुली २१, नांदूरा एकूण १४. मुले ७, मुली ७, मलकापूर एकूण २१. मुले ११, मुली १0, मोताळा एकूण ४८. मुले २४ मुली २४, असे एकूण ६६२ शाळाबाह्य मुले ऑगस्ट महिन्यात आढळली होती; मात्र प्रशासनातर्फे सर्वेक्षणानंतर आढावा घेतल्यानंतर एकूण ६६८ मुले शाळाबाह्य असल्याचे समोर आले होते. दरम्यान, सर्वेनंतर संबंधित मुलांना नजीकच्या शाळेत प्रवेश देण्याबाबत शासनाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मागील काही दिवसांत ६६८ पैकी ३६४ मुला-मुलींना ऑगस्ट महिन्यापर्यंत प्रवेश देण्यात आला आहे.

* मुलांना शाळेत आणण्यासाठी कसरत

बुलडाणा जिल्ह्यात आढळलेल्या ६६८ शाळाबाह्य मुलांपैकी ३६४ मुलांना शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. या मुलांना विविध कारणांमुळे शाळा सोडावी लागली होती; मात्र उर्वरित ३0४ मुले जन्मापासून शाळाबाह्य आहेत. त्यांना शाळेत आणण्यासाठी कसरत सुरू आहे. अशी मुले आढळल्यास त्यांना त्वरित शाळेत दाखल करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शिक्षकांना दिल्या आहेत.