शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

३३0 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार

By admin | Updated: January 8, 2017 02:21 IST

बुलडाणा जिल्हा नियोजन समितीची बैठक; मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित

बुलडाणा, दि. ७- सन २0१७-१८ करिता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासनाने घालून दिलेल्या वित्तीय र्मयादेत ३३0.0९ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. समितीने प्रस्तावित केलेल्या आराखड्यामधून विकासाची व जनकल्याणाची कामे मोठय़ा प्रमाणावर व्हावी त, अशी अपेक्षा राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शनिवारी व्यक्त केली.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन आज जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार प्रतापराव जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी. नेमाने, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक सिडाम आदी उपस्थित होते. तसेच सभागृहात आमदार राहुल बोंद्रे, डॉ. संजय रायमुलकर, डॉ. शशीकांत खेडेकर, जि. प सभापती अंकुश वाघ, गणेश बस्सी आदींसह नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. रस्ते विकासाला प्राधान्य देत शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित करण्यात आल्याचे सांगत पालकमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, की या योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये निधीची तरतूद करण्यात येणार आहे. या साठी नियोजनात १५ टक्के निधी ठेवण्यात आला आहे. यामुळे रस्त्यांचा विकास करण्यास निधी कमी पडणार नाही. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग राबवित असलेल्या लाभार्थी अनुदान योजनेचा निधी लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना देत फुंडकर म्हणाले, अशा लाभार्थींचे अनुदान बँकेने प्रलंबित ठेवू नये. लाभार्थींच्या खात्यात थेट जमा करावे. तसेच बँकांनी शेतकर्‍यांच्या खात्यावर होल्ड लावू नये. रब्बी हंगामासाठी शेतकर्‍यांना बँक खात्यातील रक्कम उपयोगात आणता यावी, यादृष्टीने कार्यवाही करावी. विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत २00 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. ही रक्कम प्राप्त झाल्यास पूर्वपरवानगी घेऊन ठिबक सिंचन संच घेतलेल्या जिल्ह्यातील ठिबक सिंचन अनुदानापासून वंचित शे तकर्‍यांना अनुदान देण्यात येईल. ते पुढे म्हणाले, आदिवासी किंवा वन गावांमध्ये विकास कामांसाठी जागेची मागणी आल्यास वनहक्के दावे तातडीने मंजूर करावे. त्यासाठी उपविभागीय स्तरावरील अधिकर्‍यांच्या बैठका घ्याव्या त. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांना उपविभागीय अधिकार्‍यांनाही बोलवावे. सिंचन व दळणवळण असे दोन्ही उद्देश पूर्ण होत असलेल्या पूलवजा बंधार्‍यांच्या कामांचे नियोजन करावे, अशी कामे भौतिकदृष्ट्या त पासून घ्यावीत. यामुळे सिंचनही होईल आणि दळणवळणासाठी रस्त्याचे काम होईल. मेहकर व खामगाव येथील वाटप झालेल्या घरकुलांच्या गैरप्रकाराची चौकशी करावी. चौकशी त्रयस्थ संस्थेकडून करण्यात यावी, असे निर्देश दिले.