शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक वनीकरणाच्या पुढाकाराने १८00 झाडांची लागवड

By admin | Updated: September 19, 2014 00:20 IST

संतनगरीच्या मार्गात भक्तांना मिळणार विसावा

नाना हिवराळे /खामगाव खामगावहून शेगावकडे जाताना शहर सोडताच संत गजानन महाराजांचा रस्ता उजाड दिसत असल्याने या मार्गाला आता हरित करण्याचा संकल्प सामाजिक वनीकरण विभागाने केला आहे. या मार्गाच्या दुतर्फा १८00 झाडांची लागवड झाली असून, दरवर्षी पायदळ दिंडीत जाणार्‍या भक्तांना विसावा म्हणून झाडांची सावली मिळणार आहे.शेगाव येथील संत श्री गजानन महाराजांच्या दर्शनाकरिता राज्यातीलच नव्हे तर इतर राज्यातूनही भक्त मोठय़ा प्रमाणात दर्शनाकरिता येत असतात. दररोज हजारो भक्तांची ये-जा संतनगरीत चालू आहे. दरवर्षी शेकडो दिंड्या राज्यभरातून पायदळ शेगावला येतात. पायी दिंडीत सहभागी झाल्यानंतर खामगाव शहर सोडताच शेगाव रस्ता हा उजाड वाटतो. तेव्हा या संतनगरीच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा झाडे जगवून रस्ता सुशोभीकरणासाठी खामगाव येथील सामाजिक वनीकरण विभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे. सामाजिक वनीकरण विभागाने शेगाव रोडवरील वरखेड ते लासुरा फाट्यापर्यंत सुमारे १८00 वृक्षांची रस्त्याच्या दुतर्फा लागवड केली आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांनी विशेष काम म्हणून संतनगरीच्या मार्गावरील झाडांकडे लक्ष देऊन ते जगविण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्या अनुषंगाने या मार्गावर निंब, करंज, गुलमोहर, पेल्टोफार्म, अमलतास, कांचन, शिशू, महारुख व वड आदी प्रजातीची झाडे लावली आहेत. तीन वर्षाच्या संगोपनानंतर ही झाडे भक्तांना विसावा देतील, असा विश्‍वास सामाजिक वनीकरण विभागाला आहे.