शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेती वाहतुकीची १६ वाहने पकडली

By admin | Updated: July 10, 2015 00:10 IST

संग्रामपूर तालुक्यातील प्रकार; २ लाख ४४ हजार दंड शासनाच्या तिजोरीत जमा.

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : तालुक्यातील वानखेड येथील वान नदीपात्रात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक करणार्‍या १६ वाहनांना गुरुवारी पकडण्यात आले. या वाहनधारकांकडून प्रत्येकी १५ हजार २५0 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तालुक्यातील वानखेड येथील वान नदीपात्रात बर्‍याच दिवसांपासून रेतीचे अवैध उत्खनन करून चोरट्या मार्गाने वाहतूक सर्रास सुरू होती. महसूल विभागाने कारवाई करण्यापूर्वीच सदर वाहने घटनास्थळाहून पलायन करण्यात पटाईत होते. ही बाब लक्षात ठेवून महसूल विभागाने सापळा रचला. त्यानुसार, येथे नव्यानेच रुजू झालेले व पदोन्नतीवर तहसीलदार म्हणून पदभार घेतलेले तहसीलदार डी.व्ही. वाहुरवाघ हे मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या ताफ्यासह गुरुवारी पहाटे वान नदीपात्रात पोहोचले. त्याठिकाणी १0 टिप्पर व सहा टॅक्टर अशा एकूण १६ वाहनांपैकी काही वाहनांमध्ये रेती भरलेली होती व काही वाहने रेती भरण्याच्या प्रतीक्षेत उभी होती. या ताफ्याने ताबडतोब तामगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तामगाव पोलिसांनी विनाविलंब घटनास्थळी धाव घेऊन महसूल विभागाच्या कारवाईत सहभाग घेतला. त्यानंतर सदर वाहने तहसील कार्यालयात आणण्यात आली. तहसील कार्यालयात ही वाहने आणल्यानंतर प्रत्येक वाहनधारकाकडील रॉयल्टीची चौकशी करण्यात आली. रॉयल्टी मिळालेली नाही म्हणून प्रत्येक वाहनधारकाकडून १५ हजार २५0 रुपये या प्रमाणे एकूण २ लाख ४४ हजार दंड वसूल करण्यात आला. या धडक कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणार्‍या वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे. रेती वाहतूक करणार्‍यांवर संग्रामपूर तालुक्यात आतापर्यंत सर्वांत मोठी कारवाई असल्याचे समजते. तहसीलदार डी.व्ही. वाहुरवाघ, मंडळ अधिकारी इंगळे, भिसे, पवार, धमाळ तसेच तलाठी परिहार, रंगदळ, जाधव यांच्यासह ताफ्यातील इतर तलाठी व पोलीस कर्मचारी सौदागर व त्यांचे सहकारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.