शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

१२९ गावांवर जलसंकट!

By admin | Updated: May 1, 2017 01:13 IST

बुलडाणा : तापमान वाढीसह जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या झळाही तीव्र झाल्या आहे. या तापमानाच्या वाढ होणार असून, सध्या १२९ गावांत जलसंकट वाढले आहे.

२० टँकरद्वारे पाणीपुरवठा : १२५ खासगी विहिरींचा आधारबुलडाणा : दिवसेंदिवस सूर्य आग ओकू लागल्याने तापमानात वाढ होत असल्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या झळाही तीव्र झाल्या आहे. या तापमानाच्या तीव्रतेत मे हिटमुळे वाढ होणार असून, सध्या १२९ गावांत जलसंकट वाढले आहे. सदर जलसंकट दूर करण्यासाठी प्रशासनाद्वारे १८ गावांची २० टँकरद्वारे, तर १११ गावांची तहान १२५ खासगी विहिरींद्वारे भागविली जात आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पावसाची नोंद झाल्याने यंदा पाणीटंचाईने उशिरा डोके वर काढले. मात्र, विक्रमी तापमान, भूजल पातळीत होणारी वेगवान घट, पाण्याचे जलद गतीने होणारे बाष्पीभवन, कोरडे होणारे जलस्रोत यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. मार्चमध्ये एकही गावात टँकर नसताना एप्रिल महिन्याच्या शेवटी १८ गावांची तहान २० टँकरद्वारे भागविली जात आहे. बुलडाणा व मेहकर तालुक्यात टँकरग्रस्त गावांची संख्या जास्त आहे. बुलडाणा तालुक्यातील चौथा, माळविहीर, हनवतखेड, गिरडा, गोंधनखेड, जांब या गावांना प्रत्येकी एका तर देऊळघाटात तीन टँकर सुरू असून रायपूर, शिरपूर या गावांना प्रत्येकी दोन टँकरद्वारे पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. देऊळघाट येथील नेहमीची पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणखी तीन टँकरची आवश्यकता आहे. मेहकर तालुक्यातील दुर्गबोरी, हिवरा साबळे, पारडी, अकोला ठाकरे, बोथा, वरवंड येथे प्रत्येकी एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दुसरीकडे चिखली तालुक्यातील सैलानीनगर, भोगावती, देऊळगाव राजा तालुक्यातील पाडळी शिंदे, नागणगाव, खामगाव तालुक्यातील निरोड, शिराळा येथे प्रत्येकी एक टँकर सुरू आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी येथे दोन टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १११ गावांसाठी विहिरींचे अधिग्रहण जिल्ह्यातील पाणीटंचाई ग्रस्त १११ गावासाठी १२५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या गावात पाण्याचे कोणतेही स्त्रोत नसल्यामुळे अधिग्रहण विहिरींव्दारे या गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात चिखली तालुक्यातील ३९ गावांना ४३, संग्रामपूर तालुक्यातील १६ गावांना २४ विहिरींव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. बुलडाणा तालुक्यातील १४ गावांना १५ तर मेहकर तालुक्यातील ४२ गावांना ४३ विहिरींव्दारे पाणीपुरवठा होत आहे. तर मलकापूर, देऊळगावराजा व मोताळा तालुक्यातील एकही विहीर अधिग्रहीत करण्यात आली नाही.