शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानांचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
3
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
4
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
5
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
6
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
7
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
8
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
9
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
10
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
11
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
12
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
13
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
14
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
15
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
16
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
17
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
18
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
19
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
20
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या

बुलडाण्यात शिवशाही बस उलटली; दहा प्रवासी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 10:59 PM

जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू

उंद्री (बुलडाणा): अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार आगाराची शिवशाही बस उलटल्यानं १0 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. आज (रविवारी) संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान चिखली तालुक्यातील उंद्री या गावाजवळ बसला अपघात झाला. अपघातातील जखमींवर उंद्री येथील प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. चांदूरबाजार आगाराची शिवशाही बस (क्र. एम. एच. 0९ - ई.एम. २५७८) औरंगाबादकडे जात होती. दरम्यान, उंद्रीनजीक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस उलटली. बसमध्ये एकूण २३ प्रवासी होते. त्यापैकी १0 प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच उंद्री व वैरागड येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी जखमींना बसमधून बाहेर काढलं. उंद्री येथे प्राथमिक उपचारानंतर, सर्व जखमींना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं. जखमींमध्ये चालक दीपक विश्‍वनाथ इंगळे (वय ४२), वाहक चंद्रशेखर अर्जुनराव नागदिवे (वय २९), संजय शंकर पोटे (वय ५0), तन्वी संजय पोटे (वय १५), अनुज संजय पोटे (वय १0) तिघेही रा. औरंगाबाद, भगवान प्रेमचंद पटेल (वय ५२), तेजल भगवान पटेल (वय १७) दोघेही रा. हतोडी ता. अंजनगाव, सुषमा संजय पोटे (वय ४५) रा. औरंगाबाद, सै.शहाबुद्दीन सै. हबीबद्दीन (वय ४५) रा. औरंगाबाद, सै.आयशा सै.शहाबुद्दीन (वय ४0) रा. औरंगाबाद यांचा समावेश आहे.  

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा