माझ्या लहानपणी आमच्याकडे दुकानात एक नोकर कामाला होता. धोंडीराम त्याचं नाव. आम्ही लहान मुलं तेव्हा त्याची लग्नावरून, मुली पाहण्यावरून बरीच चेष्टा करायचो, त्याला चिडवायचो. ...
वाहतूक सिग्नलवरील वाहनचालक हाच भारतातील सर्वाधिक घाई असलेला वर्ग होय, असा निष्कर्ष विदेशी नागरिकांनी घाईघाईत काढू नये; कारण या वर्गापेक्षाही जास्त घाईत असलेला आणखी एक वर्ग भारतात आहे. तो वर्ग म्हणजे भारतातील वृत्त वाहिन्यांमध्ये कार्यरत रथी-महारथी! ...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज ५२वा आत्मर्पण दिवस! २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी भारतमातेच्या या लढवय्या सुपुत्राने मुंबईतील दादर येथील निवासस्थानी प्रायोपवेशनाद्वारे (अन्न- औषधोपचारांचा त्याग करून) देह ठेवला. ...
नारेगावकर रस्त्यावर उतरले की काहीतरी आश्वासन द्यायचे, वेळ मारून न्यायची. कधी प्रक्रियेचे गाजर दाखवायचे, तर कधी दुसरी जागा शोधण्याचे. करायचे काहीच नाही. पुन्हा येरे माझ्या मागल्या. पालिकेचा वर्षानुवर्षे हा खेळ सुरू आहे आणि तो नारेगावकरांनी पुरता ओळखला ...
अभिजनांच्या रांगेत बसायचे, तर त्यांच्यासारखंच मुलांना इंग्रजी शाळेत घालायचे, हे यांच्या मनावर नकळत पण पक्क कोरलं गेलं आहे. तरीही हा वर्ग आपली भाषा जागतिक झाल्याचा अभिमान बाळगतो. ...
हिंदीतले ४० टक्के सिनेमे आजही दक्षिणी किंवा अन्य भाषक सिनेमांवर बेतलेले असतात. आपल्याला कुठे मूळ सिनेमांची नावं माहिती असतात? मग त्या सिनेमांमध्ये कोण कलावंत होते, त्यांनी किती जबरदस्त काम केलं, याच्याशीही आपला संबंध येण्याचं काही कारण नसतं. ...