'केवळ पैशावर निवडणूक जिंकता येत नाही' मेळाव्यात प्रफुल्ल पटेल यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 15:52 IST2025-11-17T15:50:57+5:302025-11-17T15:52:24+5:30
Bhandara : भंडारा जिल्ह्यातील चारही नगराध्यक्ष पदाचे आणि प्रभागातील नगरसेवक पदांचे उमेदवार निश्चित करण्यासाठी स्थानिक एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री उशिरा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. रात्री १२:३० वाजेपर्यंत ही बैठक चालली. या बैठकीत ते बोलत होते.

'You can't win elections with money alone', says Praful Patel at rally
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केवळ पैशावरच निवडणुका जिंकता येत नाहीत. निवडणुकीत लोक पैसा घेतात, मात्र मतदान ज्याला करायचे आहे, त्यालाच करतात. त्यामुळे कुणी स्वतःला बाहुबली समजू नये, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
भंडारा जिल्ह्यातील चारही नगराध्यक्ष पदाचे आणि प्रभागातील नगरसेवक पदांचे उमेदवार निश्चित करण्यासाठी स्थानिक एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री उशिरा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. रात्री १२:३० वाजेपर्यंत ही बैठक चालली. या बैठकीत ते बोलत होते.
पटेल पुढे म्हणाले, इतरांची आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. उलट इतरांना आपली चिंता करावी लागेल. आपण कुणी बाहुबली आहोत किंवा अन्य कुणी आहोत, त्यामुळे निवडून येणारच आहोत, असे म्हणणाऱ्यांची चिंता करू नका. असे अनेक बाहुबली मागच्या काळात मी निवडून आणले आहेत. त्यामुळे अधिक दिला. विचार करू नका असा सल्लाही त्यांनी निवडणुकीत पैसा हे माध्यम असते. जिंकायचे असेल तर पैसा खर्च करावाच लागतो. लोक पैसे घेतात. मात्र, मतदान आपल्या मनाप्रमाणे ज्याला करायचे आहे, त्यालाच करतात. 'समझनेवाले को इशारा काफी' अशा शब्दात त्यांनी सूचक इशाराही दिला.
पटेल पुढे म्हणाले, राष्ट्रवादी हा सक्षम राष्ट्रीय पक्ष आहे. महायुतीचा घटक असला, तरी पक्षाला स्वतःची ओळख आहे. शिवाजी-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा हा पक्ष आहे. त्यामुळे अन्य पक्षांनी इतरांपेक्षा स्वतःची चिंता करावी.