शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

खिचडीच्या नावाखाली पिवळा भात

By admin | Updated: November 23, 2014 23:14 IST

जिल्हा परिषद शाळांवरील विद्यार्थ्यांची गळती कमी व्हावी म्हणून केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत सुरु केलेल्या शालेय पोषण आहाराची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. शालेय पोषण आहारातून बिस्कीटे

भंडारा : जिल्हा परिषद शाळांवरील विद्यार्थ्यांची गळती कमी व्हावी म्हणून केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत सुरु केलेल्या शालेय पोषण आहाराची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. शालेय पोषण आहारातून बिस्कीटे व अंडी आधीच गायब झाली आहे. सध्या विद्यार्थ्यांना खिचडीच्या नावाखाली पिवळा भात खाऊ घातल्या जात असल्याचे चित्र भंडारा जिल्ह्यात दिसत आहे.शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी, यासाठी केंद्र सारकारने मध्यान्ह भोजन योजना सुरु केली. अंतर्गत विद्यार्थ्यांना भोजनात आठवड्यातून एकदा खिचडी सोबत सकस आहार दिल्या जावा, त्यात दुध, अंडी, केळी, बिस्कीटे तसेच रोज खिचडी सोबत वेगवेगळ्या डाळीचा समावेश असावा, असे नमूद होते. शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करुन शाळांना स्वयंपाकगृह बांधून दिले. भोजन शिजविण्याठी प्रति विद्यार्थी मानधनाची व्यवस्था करण्यात आली. सार्वजनिक वितरण प्रणालीनुसार शाळाांना तांदुळ पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली व इतर साहित्यांसाठी मुख्याध्यापकांच्या नावे विशिष्ट रकमेची तरतुद करण्यात आली. पंरतु या सर्व वस्तू खूपच कमी पहावयास मिळतात. विद्यार्थ्यांना केवळ पोषक खिचडीच्या नावाखाली पिवळा भात दिला जात असल्याचे दिसत आहे. त्यात डाळ हा पदाथे अतिशय कमी असल्याचे दिसून येते. याकडे शिक्षण विभागाचे व शाळा व्यवस्थापन समितीचे दुर्लक्ष होत आहे. हा पिवळा भात खाण्याचा आता विद्यार्थ्यांना कंटाळा आला असून ते देखील या भाताकडे आता नाक मुरडत आहे.या खिचडीत दररोज वेगवेगळ्या भाज्या आणि डाळी असणे अनिवार्य आहे. पण तसे कुठेच दिसत नाही तसेच हे अन्न शिजवित असलेल्या महिलांनाही अत्यल्प मानधन दिले जात असल्याचे महिला सांगत आहे. पोषण आहार शिजविण्याचे कंत्राट घेतलेल्या अनेक बचत गटांनी आता काम सोडून दिले आहेत. त्यामुळे अडचण येत आहे.(नगर प्रतिनिधी)