शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त भागात कर्मचाऱ्यांची वाणवा

By admin | Updated: August 21, 2014 23:38 IST

नक्षलग्रस्त भागातील जनतेला प्राधान्याने सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र साकोली तालुक्यात दिसून येत आहे.

साकोली : नक्षलग्रस्त भागातील जनतेला प्राधान्याने सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र साकोली तालुक्यात दिसून येत आहे. येथील तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागाची दैनावस्था पाहिल्यानंतर या प्रकारावर शिक्कामोर्तब होते. अन्न व पुरवठा विभागाचा कारभार केवळ दोन अधिकाऱ्यांच्या भरवशावर चालत आहे. त्यामुळे येथे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.तहसील कार्यालयात जनतेच्या सोयीसाठी व जनतेला दरमहा राशन दुकानातून अन्नधान्य नियमाप्रमाणे मिळावे यासाठी स्वतंत्र अन्नपुरवठा विभाग आहे. या अन्न पुरवठा विभागांतर्गत एकुण ८५ गावाचा समावेश आहे. त्याकरिता या विभागाकरिता शासनातर्फे एकूण दहा कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. यात निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक, दोन अव्वल कारकुन, तीन कनिष्ठ लिपीक, एक हमाल कम स्वीपर, एक चौकीदार यांचा समावेश आहे असे असून सुद्धा मागील तीन वर्षापासून या विभागात फक्त एक निरीक्षण अधिकारी व एक पुरवठा अधिकारी असो दोन अधिकारी आहेत व दोनच अधिकारी या संपूर्ण पुरवठा विभागाचा काम पाहतात. या विभागात फाईल नेण्यासाठी एकही शिपाई नाही त्यामुळे शिपायाचे कामही पुरवठा निरीक्षक यांना करावे लागते. ही या विभागाची शोकांतिका आहे. साकोली तालुक्यात आज घडीला २४ हजार ५९ एवढे संख्या असून राशन दुकानाची संख्या १०४ एवढी आहे. राशन कार्ड व संबंधित अडचणी उद्भल्यास नागरिक या विभागात येतात. मात्र कर्मचाऱ्यांअभावी नागरिकांना लहानशा कामासाठी पाच ते सातवेळा चकरा माराव्या लागतात. जिल्हाधिकारी यांनी या समस्येकडे लक्ष देऊन कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)