शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

महालगाव येथील बंधाऱ्याचे काम निकृष्ट

By admin | Updated: June 12, 2017 00:31 IST

महालगाव - मोरगाव येथील गायमुख नाल्यावर जलयुक्त शिवार योजनेतून बंधारा बांधण्यात येत आहे.

पुरातच वाहून जाण्याची शक्यता : गावकऱ्यांतर्फे जनआंदोलनाचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : महालगाव - मोरगाव येथील गायमुख नाल्यावर जलयुक्त शिवार योजनेतून बंधारा बांधण्यात येत आहे. या बंधाऱ्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून तसेच प्रमाणापेक्षा कमी साहित्य वापरण्यात येत आहे. त्यामुळे बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. हा बंधारा एक दोन पुरातच वाहून जाण्याची शक्यता असून त्यामुळे जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बंधाऱ्याच्या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी सुधाकर बुरडे, सुनिल मेश्राम आदींनी केली आहे.महालगाव मोरगाव जवळील नाल्यावर जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने दोन बंधाऱ्यांचे काम जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मंजूर झाले आहेत. या बंधाऱ्याचे बांधकाम सुशिक्षित बेरोजगार अभियंता चुटे यांना देण्यात आला आहे. मात्र त्यांनी हे काम स्वत: न करता अवैधरित्या पेटीकॉन्ट्रॅक्टर सुधाकर गायधने यांना दिले आहे. बंधाऱ्याचे बांधकाम पेटीकॉन्ट्रॅक्टर करीत आहे. बंधाऱ्याच्या बांधकामात अल्प प्रमाणात लोहा, सिमेंट वापरण्यात येत असून काँक्रीटमध्ये मोठमोठे दगड, मातीमिश्रीत रेती तसेच नाल्यातील गढूळ मातीमिश्रीत पाणी तसेच रेती वापरण्यात येत आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे बांधकाम न करता कंत्राटदार आपल्या मनमर्जीने हा पेटी कॉन्ट्रॅक्टर काम करीत आहे. शाखा अभियंत्याला हाताशी धरून हा सर्व खेळखंडोबा सुरु आहे. ज्या उद्देशाने व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येत आहे. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने बांधकाम त्वरीत थांबवून झालेल्या कामाची तपासणी करावी. तसेच उत्कृष्ट व टिकाऊ बंधारा तयार करण्यात यावा अन्यथा गावकऱ्यांतर्फे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा सुधाकर बुरडे, सुनिल मेश्राम यांनी निवेदनातून दिला आहे. लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, मोहाडीचे तहसीलदार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी यांना या बाबत निवेदन दिले आहे.