पाच महिन्यापासून धान मोजणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:35 AM2021-04-08T04:35:56+5:302021-04-08T04:35:56+5:30

या आधारभूत धान खरेदी केंद्रामध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोपही शेतकरी करीत आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. जिल्हा पणन ...

Without counting paddy for five months | पाच महिन्यापासून धान मोजणीविना

पाच महिन्यापासून धान मोजणीविना

Next

या आधारभूत धान खरेदी केंद्रामध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोपही शेतकरी करीत आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. जिल्हा पणन अधिकारी यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रामधून कुर्झा व वासेळा गावे या गावाला जोडून खरेदी थांबविली. तसेच पणन अधिकाऱ्यांनी धान खरेदी केंद्र ३ मार्चपासून मेंढा पुनर्वसन येथे सुरू केले. सदर केंद्र सुरू सुरळीत चालले नाही. पूर्णपणे धान खरेदी बंद आहे.

आधारभूत धान खरेदी केंद्राचा भ्रष्टाचार नाहक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांचे धान मोजून द्यावे व संबंधितांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनात रामू रामटेके, राहुल सोनटक्के, एकनाथ मुंडे, गुंडेराव कावळे, राजकुमार बारेकर, विजय गजभिये, सिद्धार्थ रामटेके, रतिराम दंडारे, केशव चित्रीव, कवडू रघुते, विठ्ठल दोनोडे, हरी रघुते, ज्ञानेश्वर रघुते, मुरलीधर रघुते, मधुकर रघुते, सुखदेव फुंडे, पिंटू फुंडे, दामोदर कावळे, दौलत खडसंगी, परसराम हुकरे, राजकुमार येटरे आदी शेतकऱ्यांचा सहभाग आहे.

Web Title: Without counting paddy for five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.