शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

विकासाचा ध्यास सोडणार नाही

By admin | Updated: February 19, 2015 00:34 IST

पक्ष संघटनेसाठी कार्यकर्ता महत्वाची भूमिका बजावतो. यामुळेच पक्ष वाढतो. सत्तेत असताना विकास हा एकच ध्यास डोळ्यासमोर ठेवला.

लाखांदूर : पक्ष संघटनेसाठी कार्यकर्ता महत्वाची भूमिका बजावतो. यामुळेच पक्ष वाढतो. सत्तेत असताना विकास हा एकच ध्यास डोळ्यासमोर ठेवला. परंतु जनतेने नाकारले. केंद्रात सत्ता नसली तरी वजन आहे. त्यामुळे भंडारा - गोंदिया जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास सोडणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी केले.लाखांदूर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अविनाश ब्राम्हणकर, उदय भैय्या, चंद्रशेखर टेंभुर्णे, नरेश दिवटे, शिलमंजू सिव्हगडे, तालुका राकाँ अध्यक्ष बालू चुन्ने, देविदास राऊत, मनोहर चंद्रिकापुरे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, केंद्रात सत्ता स्थापन करणाऱ्यांनी जनतेचा विश्वासघात करीत शेतकरी, गोरगरीबांच्या शासन योजनांना कात्री लावली. जनधन योजनेखाली बँकेत खाते उघडण्यास लावून अद्याप त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रतिक्षा संपता संपेना. दोन्ही जिल्ह्यावर संकट ओढवले. नक्षलग्रस्त भाग वगळता, शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळावा म्हणून बोंबा मारणारे न्याय न देता गप्प बसले. काळ्या पैशाचा मुद्दा मोठ्या गाजावाजात उचलून धरला. मात्र सत्ता प्राप्त होताच जनतेकडे दुर्लक्ष करून जिल्ह्याच्या विकासाला कैची लावली. सत्तेत नाही, मात्र वजन कमी नाही. निवडणुकीत हरलो. मात्र जिल्ह्यातील शेतकरी, बेरोजगार यांच प्रश्न सदैव सोडविण्यासाठी आपण सदैव तत्पर असून त्यासाठी संघटन व प्रत्येक कार्यकर्त्याने तन मनाने पक्ष वाढीसाठी आतापासूनच कामाला लागावे. जेणेकरून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत त्याचा लाभ होईल असे आवाहनही कार्यकर्त्यांना केले. संचालन बालू चुन्हे यांनी तर आभारप्रदर्शन देवीदास राऊत यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)