शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

साकोली तहसील कार्यालयाची इमारत गळते तेव्हा !

By admin | Updated: July 22, 2014 23:51 IST

येथील तहसील कार्यालयाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने कार्यालयाच्या दुरुस्तीकडे पुर्णत: दुर्लक्ष झाले आहे. परिणामी ही इमारत पावसाळ्यात गळत आहे. त्यामुळे येथील महत्वाचे दस्ताऐवज

संजय साठवणे - साकोली येथील तहसील कार्यालयाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने कार्यालयाच्या दुरुस्तीकडे पुर्णत: दुर्लक्ष झाले आहे. परिणामी ही इमारत पावसाळ्यात गळत आहे. त्यामुळे येथील महत्वाचे दस्ताऐवज पाण्याने ओलेचिंब झाले आहेत. गळणाऱ्या ठिकाणी पाण्याच्या बादल्या लावून ठेवलेल्या आहेत. साकोली तहसील कार्यालयाची इमारत ब्रिटीशकालीन असून या इमारतीची साधी डागडुजीही झालेली नाही. या तहसील कार्यालयात तालुक्यातील नागरिकांचे महत्वपूर्ण दस्ताऐवज आहे. शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना या कार्यालयाची गरज पडते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या इमारतीची दुरुस्ती झालेली नाही. परिणामी मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ही संपूर्ण इमारत गळत आहे. त्यामुळे या कार्यालयातील एकही रुम अशी नाही की त्यात पाणी गळत नाही. त्यामुळे कार्यालयातील महत्त्वाचा दस्ताऐवज गळणाऱ्या पाण्याने भिजला आहे. त्यामुळे आज या कार्यालयातील सर्वच कर्मचारी काम न करता कार्यालयीन कागदपत्रे सांभाळण्याच्या कामात व्यस्त झाले होते. त्यामुळे टेबलवर कागदपत्रांचे गठ्ठे मांडण्यात कर्मचारी सक्रीय दिसत होते.