शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस संरक्षणाशिवाय आम्ही काम करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST

लाखनी येथील आशा वर्कर कोरोना संबंधित माहिती घेण्यासाठी गेल्या असता एका कुटुंबियाने आशा वर्करला नगर पंचायत प्रशासनाला एका रुग्णामागे दीड लाख रूपये मिळतात व त्यात आशा वर्करचा हिस्सा असतो, असे चुकीचे आरोप करीत भांडण केले. एवढेच नव्हे तर मारण्याची धमकी दिली आहे.

ठळक मुद्देलाखनी तहसीलदारांना संघटनेचे निवेदन, आशा वर्करला धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : शहरात एकाच प्रवर्गातील १९ कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतही आशा वर्कर आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहे. मात्र तपासणीसाठी गेलेल्या आशा वर्करशी भांडण करून एकाने मारण्याची धमकी दिल्याने आशा वर्कर धास्तावल्या आहेत. त्यामुळे आम्ही पोलीस संरक्षण मिळाल्याशिवाय काम करणार असा इशारा आशा वर्कर संघटनेने तहसीलदारांदिलेल्या निवेदनातून दिला आहे.
लाखनी येथील आशा वर्कर कोरोना संबंधित माहिती घेण्यासाठी गेल्या असता एका कुटुंबियाने आशा वर्करला नगर पंचायत प्रशासनाला एका रुग्णामागे दीड लाख रूपये मिळतात व त्यात आशा वर्करचा हिस्सा असतो, असे चुकीचे आरोप करीत भांडण केले. एवढेच नव्हे तर मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आशा वर्कर संघटनेने तहसीलदारांना पोलीस संरक्षण तसेच आरोग्य विभागाचा चमू सोबत असल्याशिवाय आम्ही कोरोनाचे ेकामकाजावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले आहे.
तालुक्यात असा प्रसंग पुन्हा उद्भवण्याची शक्यता असल्याने आमचा जीव धोक्यात असून कोरोना सर्वेक्षण तसेच इतर कामांसाठी आरोग्य विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कार्याशी संबंधित विभागाचा चमू तयार करून त्या चमूद्वारे सर्व कामे करावायाचा शासनाचा आदेश आहे. मात्र प्रत्यक्षात ही सर्व कामे आशा वर्ककडूनच करून घेतली जात आहेत. त्यामुळे आशा वर्कर कर्मचाऱ्यांना कमी मानधनासह विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देवून समस्या सोडविण्याची मागणी आयटकप्रणित आशा वर्कर संघटनेने केली आहे.

शिष्टमंडळ एकवटले
आशा वर्कर जीव मुठीत घेवून कोरोना योद्धाचे काम करत असताना समाजातील काही जण सहकार्य न करता त्रास देत आहेत.यासाठी आशा वर्कर संघटनेतर्फे तहसीलदारांना समस्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आयटकचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार गणवीर, भुमिका वंजारी, वनिता निर्वाण, नंदा चवळे, आशा धांडे, महानंदा रामटेके, श्यामली गिरीपुंजे, अनिता साठवणे, अर्चना भैसारे, तारा मोटघरे, मीना लारोकर, माया धरमशहारे आदी उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते कामे करताना येत असलेल्या समस्या मांडण्यात आल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या