शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजना अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST

पवनी तालुक्यातील चिचाळ येथे पाणी पुरवठा करण्यात येणारी जलवाहिनी जीर्ण झाल्याने दरवर्षीच पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ७९ लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. सदर योजनेत काम करताना कंत्राटदाराने निकृष्ट साहित्याचा वापर केला. ग्रामपंचायतीनेही गावात दवंडी देऊन टॅक्स वसुली करीत नागरिकांना नवीन नळाची जोडणी करून दिली.

ठळक मुद्देचिचाळ येथे पाण्यासाठी बोंब : जुनी नळयोजना झाली कालबाह्य

प्रकाश हातेल।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिचाळ : चिचाळ येथे पाणीपुरवठा करण्यात येणारी जुनी नळयोजना जीर्ण झाली आहे. परिणामी मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम पूर्ण झाले तरी निकृष्ट साहित्य वापराने योजना अपयशी ठरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सदर योजना अधांतरी असून गावात पाण्यासाठी बोंब सुरु आहे.
विशेष म्हणजे या योजनेंतर्गत कंत्राटदाराला जलवाहिनी तात्काळ बदलवून सात दिवसात काम पूर्ण करण्याचे कळविण्यात आले आहे. अन्यथा आपल्यासोबत केलेला करारनामा रद्द करून नाव काळ्या यादीत घातले जाईल, असेही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
पवनी तालुक्यातील चिचाळ येथे पाणी पुरवठा करण्यात येणारी जलवाहिनी जीर्ण झाल्याने दरवर्षीच पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ७९ लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली.
सदर योजनेत काम करताना कंत्राटदाराने निकृष्ट साहित्याचा वापर केला. ग्रामपंचायतीनेही गावात दवंडी देऊन टॅक्स वसुली करीत नागरिकांना नवीन नळाची जोडणी करून दिली. मात्र पाणी वाहून नेणारी उर्ध्वनलिका वारंवार फुटत असल्याने नागरिक पाण्यापासून वंचित राहत आहेत. तांत्रिकदृष्ट्या योग्यरित्या जलवाहिनीला थातूरमातूर डागडुजी करून त्यावर काँक्रीट टाकण्यात आले. अशा स्थितीत जवळपास तीन महिने पाणीपुरवठा योजना चालविण्यात आली. याबाबत कंत्राटदाराला वारंवार सूचना देऊनही दुरुस्ती होत नसल्याने ग्रामस्थांचा ग्रामपंचायत प्रशासनावर रोष व्यक्त होत आहे.

कृत्रिम पाणीटंचाई
याबाबत सदर कंत्राटदाराला वारंवार पत्रान्वये कळवूनही कुठलीच कारवाई न झाल्याने गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वापरण्यात आलेली जलवाहिनी बदलवून नवीन जलवाहिनी घालण्यात यावी, अशी बाबही पत्रात नमूद केली आहे.

कंत्राटदाराने वापरलेली जलवाहिनी निकृष्ट दर्जाची असल्याने वारंवार पाण्याची गळती होत आहे. परिणामी गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जलवाहिनी पूर्णपणे बदलविण्याची गरज आहे.
-लोपमुद्रा वैरागडे, सरपंच, चिचाळ

टॅग्स :Waterपाणी