गणेशपूर टोली परिसरातील घरांत शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST2021-09-17T04:42:12+5:302021-09-17T04:42:12+5:30

पवनारखारी ग्रामपंचायतीने गणेशपूर टोली परिसरात रस्ता बांधकाम केले होते. परंतु रस्त्याच्या शेजारी नाल्यांचे बांधकाम केले नाही. त्यामुळे रस्ता ...

Water seeped into houses in Ganeshpur team area | गणेशपूर टोली परिसरातील घरांत शिरले पाणी

गणेशपूर टोली परिसरातील घरांत शिरले पाणी

पवनारखारी ग्रामपंचायतीने गणेशपूर टोली परिसरात रस्ता बांधकाम केले होते. परंतु रस्त्याच्या शेजारी नाल्यांचे बांधकाम केले नाही. त्यामुळे रस्ता बांधकामाचा फटका गणेशपूर टोली परिसरातील नागरिकांना बसला आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून तुमसर तालुक्यात पाऊस कोसळत आहे. सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. येथील कैलास लाडे, प्रभा ऊके, राजेश पांगुडे, लक्ष्मीकांत लोखंडे यांच्या घरात पाणी शिरले आहे. अनेक वर्षांपासून त्यांचे तेथे वास्तव्य आहे. २००८ मध्ये पवनारखारी ग्रामपंचायतीकडे यासंदर्भात तक्रार केली होती. परंतु त्यांनी याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. पावसाचा जोर अद्याप कायम आहे. त्यामुळे या कुटुंबांना राहावे कसे, असा प्रश्न पडला आहे. पावसाचे पाणी ओसरल्यानंतर येथे इतर आजारांची शक्यता बळावली आहे.

Web Title: Water seeped into houses in Ganeshpur team area