शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोंड्याटोल्यातून पाण्याचा उपसा

By admin | Updated: September 12, 2016 00:28 IST

बावनथडी नदीतून पाण्याचा उपसा करुन चांदपूर तलावात सोडणे सध्या सुरु आहे. चांदपूर तलावात सुमारे ५० टक्के जलसाठा झाला आहे.

कालवा फुटल्याने नदीत प्रवाह : चांदपूर तलाव ५०.६७ टक्के जलसाठातुमसर : बावनथडी नदीतून पाण्याचा उपसा करुन चांदपूर तलावात सोडणे सध्या सुरु आहे. चांदपूर तलावात सुमारे ५० टक्के जलसाठा झाला आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेच्या नऊपैकी सात मशीन्स सुरु आहे. चांदपुर तलावातील पाणी सिहोरा परिसरातील गावांना खरीप पिकांकरिता मिळणार आहे. बावनथडी प्रकल्पाचा कालवा फुटल्याने नदीत पाण्याचा प्रवाह असल्याची माहिती आहे.सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेवर सुमारे ३५ लाखांचे वीज बिल थकीत होते. याकरिता सिहोरा परिसरात राजकीय पक्षांनी आंदोलने करुन शासनाचे लक्ष आकर्षीत केले होते. आ. चरण वाघमारे यांनी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांची भेट घेवून थकीत वीज बिलाकरिता प्रयत्न केले. राज्य शासनाने १५ लाखांचा निधी देण्याचे जाहिर केले. मागील आठ ते दहा दिवसापासून बावनथडी नदीतून चांदपूर तलावात पाणी उपसा करण्यात येत आहे. चांदपूर तलावात सुमारे ३५ टक्के जलसाठा यामुळे उपलब्ध झाला आहे. खरीप व रब्बी पिकांकरिता हा जलसाठा उपलब्ध करण्यात येणार आहे.सिहोरा परिसरातील सुमारे ४५ गावांना चांदपूर जलाशयातून शेती सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होते. तलावात मासेमारी सुध्दा करण्यात येते. यावर्षी पाऊस न आल्याने तलाव रिकामाच आहे. केवळ सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेमुळे पाणी उपसा केल्याने तलावात किमान जलसाठा दिसत आहे. यापूर्वीच पाणी उपसा करण्याची गरज होती. अर्धा पावसाळा निघून गेल्यानंतर पाणी उपसण्याला सुरुवात झाली. पाणी उपशण्याचे नियोजन किमान उन्हाळ्यात करण्याची गरज आहे. तहान लागल्यावर विहिर खोदण्याचा प्रकार येथे दिसून येतो. जलसाठवण योजनेवर लाखोंचा निधी खर्च करण्यात येतो. येथे केवळ पाणी उपसा करुन तलावात सोडण्याकरिताच मोठ्या अग्नीदिव्यातून जावे लागते.या जलसाठ्याचा उपयोग शेतकऱ्यांसोबतच पर्यावरणालाही येथे फायदयाचा ठरतो. हे विशेष. १२ सप्टेंबरपासून येरली परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उजवा कालव्यात पाणी सोडण्याचे नियोजन आहे. १५ सप्टेंबरपासून डावा कालव्याअंतर्गत सिहोरा, चुल्हाड, रेंगेपार, परसवाडा (सि) परिसरात शेतकऱ्यांकरिता पाणी सोडण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)बावनथडी नदीतील प्रवाह व येवा यानुसार पाणी उपसा करण्यात येतो. खरीप व रब्बी पिकांकराित मागणीनुसार पाणी सोडण्यात येईल. पाणी उपश्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या चांदपूर तलावात ५०.६७ टक्के जलसाठा आहे.- सुरेश वाईदेशकर,शाखा अभियंता, चांदपूर