शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ओमायक्रॉन रोखायचाय; बूस्टर सोडा, आधी पहिला डोस घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत १५ लक्ष ७४ हजार २९३ व्यक्तींनी लस घेतली आहे. यापैकी पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या आठ लक्ष ७४ हजार ६५६ आहे. तर दुसरा डोस सहा लक्ष ९९ हजार ६३७ जणांनी घेतला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत दिवसभरात दहा हजार ६४१ व्यक्तींनी १६३ केंद्रांमधून डोस घेतला. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बुस्टर डोस घेण्यासोबतच आतापर्यंत एकही डोस न घेतलेल्यांनी आवर्जून प्रथम लस घेणे गरजेचे झाले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा  : डेल्टा व ओमायक्रॉन विषाणुची रोखथाम करीत असतानाच डेल्मीक्रॉननेही अन्य देशात धडक दिली आहे. त्यामुळे सध्या ओमायक्रॉन रोखायचे असेल तर ज्यांनी आतापर्यंत लसीचा एकही डोस घेतला नाही त्यांनी लस घेणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार असून जिल्ह्यातील दीड लक्ष ज्येष्ठ नागरिकांनाही बुस्टर डोस देण्यात येणार आहे.जिल्ह्यात आतापर्यंत १५ लक्ष ७४ हजार २९३ व्यक्तींनी लस घेतली आहे. यापैकी पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या आठ लक्ष ७४ हजार ६५६ आहे. तर दुसरा डोस सहा लक्ष ९९ हजार ६३७ जणांनी घेतला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत दिवसभरात दहा हजार ६४१ व्यक्तींनी १६३ केंद्रांमधून डोस घेतला. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बुस्टर डोस घेण्यासोबतच आतापर्यंत एकही डोस न घेतलेल्यांनी आवर्जून प्रथम लस घेणे गरजेचे झाले आहे.

दीड लक्ष ज्येष्ठांना मिळणार बूस्टर- जिल्ह्यात आतापर्यंत ६० वयोवर्षावरील दोन लक्ष ९७ हजार १८६ ज्येष्ठ नागरिकांनी डोस घेतले आहे. तसेच ४५ ते ६० या वयोगटातील चार लक्ष १३ हजार २६४ नागरिकांनी लसीकरण केले आहे. त्यामुळे आता नवीन वर्षात जिल्हाभरातील जवळपास दीड लक्ष नागरिकांना बुस्टर डोस देण्यासंदर्भात तयारी आरोग्य प्रशासनाने केली आहे.

१० हजार हेल्थ केअर वर्करना मिळणार बूस्टर- कोरोना महामारीत अनन्यसाधारण भूमिका वठविणाऱ्या जिल्हाभरातील हेल्थकेअर वर्कर्सना लसीकरणाचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे. ११ हजार २४ हेल्थ केअर वर्करनी पहिला डोस तर दुसरा डोस दहा हजार ८७१ जणांनी घेतला आहे. जिल्ह्यात आगामी काळात दहा हजार पेक्षा जास्त हेल्थ केअर वर्कर्सना बुस्टर डोस देण्याचे उद्दिष्ट आहे.

लस घेणे महत्वाचे

कोरोना महामारीवर लस घेणे हाच एकमेव उपाय आहे. याशिवाय मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. ओमायक्रॉनचा एकही रुग्ण जिल्ह्यात नाही. मात्र दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांनी आजपर्यंत एकही लस घेतली नाही त्यांनी कोविड लस घ्यावी. -डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा

१५ ते १८ वयोगटातील ५५ हजार ७५५  जणांना देणार लस

- केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील अनुमानित ५५ हजार ७५५ मुलांना कोविड लस देण्यासंदर्भात जिल्हा आरोग्य प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. यासाठी विविध दिशा निर्देशही आरोग्य विभागाच्यावतीने जारी करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लस