शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पीक वाचविण्यासाठी रात्र काढावी लागते जागून

By admin | Updated: October 28, 2014 22:52 IST

यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना शेतीतून काहीही उत्पादन मिळण्याची शक्यता नाही. त्यातच ज्यांच्या शेतात काही प्रमाणात पिके आहेत ती कशी वाचवावी? या समस्येत शेतकरी आहे.

भंडारा : यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना शेतीतून काहीही उत्पादन मिळण्याची शक्यता नाही. त्यातच ज्यांच्या शेतात काही प्रमाणात पिके आहेत ती कशी वाचवावी? या समस्येत शेतकरी आहे. या पिकांना देण्यासाठी ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे तेसुद्धा भारनियमनामुळे पाणी देऊ शकत नाही. रात्रभर जागून पिकांना कसेतरी पाणी द्यावे लागत आहे.यावर्षी आधीच निसर्गाने त्रस्त केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून धानपिके पिके गेली. सुरूवातीला पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले. त्यानंतर पावसाळा संपताना काही प्रमाणात दमदार पाऊस झाला आणि पिकांना उभारी मिळाली. आॅक्टोबर महिन्यातवातावरणात झालेल्या बदलामुळे पिकांवर किडींचा प्रादूर्भाव दिसून आला. त्यामुळे हातातील पिकेही जाण्याची भिती निर्माण झाली. यातच पिकांना पाण्याची गरज असताना भारनियमनामुळे ते देता येणे कठिण झाले आहे. विहिरींमध्ये पाणी असूनही भारनियमनामुळे ते पाणी पिकांपर्यंत पोहचविणे शक्य होत नाही. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातच रात्र जागून काढावी लागत आहे. जेव्हा वीज येते तेव्हा ते पाणी द्यावे लागत आहे. परंतु १५ ते २० मिनिटातच पुन्हा विद्युत पुरवठा खंडीत होतो. अशा स्थितीत सतत शेतात राहण्याशिवाय पर्याय नाही. मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जागलीला जावे लागत आहे. ज्यांच्याकडे घरात एकापेक्षा अधिक माणसे आहेत, अशांना पिके वाचविणे शक्य होत आहे. परंतु ज्या घरात एकटाच माणूस आहे अशा शेतकऱ्यांना रात्रभर पिकांना पाणी देण्याच्या प्रतिक्षेत शेतात थांबून राहणे कठीण होत आहे.त्यातच अनेकांची शेती जंगलाला लागून असल्यामुळे वन्यप्राण्यांच्या हैदोसालाही तोंड द्यावे लागत आहे. अनेक संकटातून वाचलेले पीक वन्यप्राणी आता नष्ट करीत आहेत. रानडुकरे शेतात घुसून पिकांची नासाडी करीत आहे. याबाबत वनविभागाकडे तक्रारी करूनही त्यांची दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यावंर एका पाठोपाठ एक नैसर्गिक संकटे सुरूच आहे. डोक्यावरील कर्ज तसेच आहे. त्यामुळे बँका कर्ज देण्यासाठी तयार नाही. अनेकांच्या घरची विवाह खोळंबली आहे. अशावेळी वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)