शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

५०० हेक्टर क्षमतेच्या तलावांची लीज माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:31 AM

भंडारा आणि गोंदिया हे तलावाचे जिल्हे असून तलावांची लीज कमी करण्याची मागणी मासेमारी संस्थांनी केली होती. आता ५०० हेक्टर क्षमता असणाऱ्या तलावांना लीज माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची घोषणा : गोसे प्रकल्प दीड वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : भंडारा आणि गोंदिया हे तलावाचे जिल्हे असून तलावांची लीज कमी करण्याची मागणी मासेमारी संस्थांनी केली होती. आता ५०० हेक्टर क्षमता असणाऱ्या तलावांना लीज माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.भंडारा जिल्ह्यातील ५१८ कोटी ६४ लाख रुपये किमतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण शनिवारी साकोली येथे करण्यात आले. यावेळी आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक करण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात असलेल्या ५०० ते हजार हेक्टर क्षमतेच्या तलावांना ६०० तर हजार हेक्टरवरील तलावांसाठी ९०० रूपये लीज आकारली जाईल. तलावाचे कंत्राट केवळ मासेमारी संस्थांनाच देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोसे प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासणार नसून येत्या दीड वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाला निधी दिल्यामुळे ५० हजार हेक्टर सिंचन झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे शेतकºयांना १२ ते १४ तास वीज देण्याची मागणी केली.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते साकोली येथे तीन कोटी २३ लाख २३ हजार रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या तहसील कार्यालय इमारतीचे लोकार्पण, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडेगाव येथे चार कोटी ९९ लाख २३ हजार रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कार्यशाळा व प्रशिक्षण इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यासोबतच जिल्ह्यातील विविध रस्ते आणि विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.या सोहळ्याला विजय राहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, साकोलीच्या नगराध्यक्ष धनवंता राऊत, भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे उपस्थित होते.धानाच्या तणसापासून इथेनॉल -नितीन गडकरीभंडारा येथे बॉयो एव्हीएशन फ्युल हब निर्माण करण्याचा माणस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. यामुळे धानाच्या तणसापासून इथेलॉनची निर्मिती होवून धानाला पर्याय मिळेल. शेतकऱ्यांना आर्थिक लाभ तसेच तरूणांच्या हातांना काम मिळेल, शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.मुख्यमंत्री सडक योजनेत ७५० कोटींचे रस्तेमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत ७५० कोटींचे रस्ते जिल्ह्याला देण्यात आल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ४ लाख ६१ हजार परिवाराने शासकीय योजनांचा लाभ घेतला. दीड लाख शेतकऱ्यांना वर्ग २ ते वर्ग १ चा लाभ मिळाला. ९९ हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगत भंडारा येथील महिला रुग्णालयासाठी ५० कोटी रुपये देण्यात आल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पChief Ministerमुख्यमंत्री