लघुपाटबंधारे उपविभागाला हिरव्या कंदिलाची प्रतीक्षाच

By Admin | Updated: April 23, 2016 00:39 IST2016-04-23T00:39:07+5:302016-04-23T00:39:07+5:30

राजीव सागर बावनथडी प्रकल्पाला प्रधानमंत्री सिंचन योजनेत जरी समावेश केला गेला असला तरी मात्र तालुक्यात ...

Waiting for a green loin in a subdivision subdivision | लघुपाटबंधारे उपविभागाला हिरव्या कंदिलाची प्रतीक्षाच

लघुपाटबंधारे उपविभागाला हिरव्या कंदिलाची प्रतीक्षाच

दुर्लक्ष : लोकप्रतिनिधींने लक्ष देण्याची गरज
राहुल भुतांगे  तुमसर
राजीव सागर बावनथडी प्रकल्पाला प्रधानमंत्री सिंचन योजनेत जरी समावेश केला गेला असला तरी मात्र तालुक्यात मंजुर असलेला लघु पाटबंधारेचा उपविभागाला अजुनपर्यंत हिरवा कंदिल मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कामे लांबणार असून लोकप्रतिनिधीने लक्ष देण्याची गरज आहे.
तुमसर तालुक्यात मालगुजारी तलावांची संख्या लक्षात घेता त्या तलावांची देखभाल दुरूस्ती तसेच पाण्याच्या विनियोग कोल्हापूरी बंधारे, राष्ट्रीय रोजगार हमीची अनेक तांत्रिक कामे, पाण्याचा स्त्रोत वाढविण्याचे कार्य आदी कामे या विभागामार्फत होतात. जीवनदायी बावनथडी प्रकल्पाला यावर्षी प्रधानमंत्री सिंचन योजनेत समाविष्ठ करण्यात आल्याची माहिती खा. नाना पटोले यांनी दिली व लवकरच म्हणजे मार्च २०१७ पर्यंत बावनथडीचे कार्य पूर्ण होणार असल्याचे सांगितले. बावनथडीचे आतापर्यंत बावन किस्ते सांगण्यात आले. मात्र अजूनपर्यंत बावनथडीचे पूर्ण झालेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आताही मालगुजारी, खाजगी व पाटबंधारे विभागाच्या तलावावरच अवलंबून राहावे लागत आहे. हे त्रिकालवादी सत्य असल्यामुळेच सन २०११ मध्ये ग्रामविकास मंत्रालयातर्फे नंदुरबार तसेच परभणी जिल्ह्यातील तालुक्यात लघुपाटबंधारेचा उपविभाग व भंडारा जिल्ह्यात तुमसर, मोहाडी व लाखांदूर येथेही उपविभाग मंजुर करण्यात आले असता त्यावेळी नंदुरबार व परभणी जिल्ह्यातील तालुक्यात उपविभाग सुरूही करण्यात आले. मात्र माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक आणि जिल्ह्यात मंजुर असलेल्या तालुक्यात ५ वर्षे लोटली तरी अजुनपर्यंत कार्यालय सुरूच झाले नाहीत. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणारी तात्काळ सेवा तर सोडाच कित्येकदा जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयाचे हेलपाटे खावूनही अधिकारी व अभियंते जागेवर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आल्या पावली परत जावे लागते. परिणामी शेतकऱ्यांना शारीरिक, मानसिक त्रासह आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. जिल्ह्यात ही कार्यालये नव्याने उघडली गेली तर होवू घातलेल्या एमपीएससी मार्फत विदर्भाचे डेप्टी इंजिनिअर्स तालुक्याला मिळाले असते.

Web Title: Waiting for a green loin in a subdivision subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.